-
कर्जत-जामखेड मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत.
-
रोहित पवार सोशल मीडियावरही सक्रिय असतात.
-
कामाबद्दल आणि अन्य अनेक गोष्टींबद्दलची माहिती सोशल मीडियावरून ते सगळ्यांपर्यंत पोहचवत असतात.
-
नुकतंच त्यांनी नागपूर दौऱ्यादरम्यानचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
नागपूर दौऱ्यादरम्यान रोहित पवारांनी एका कार्यकर्त्याच्या घरी पुरणपोळ्यांचा आस्वाद घेतला.
-
रोहित पवारांनी फक्त पुरणपोळ्यांच्या आस्वादच घेतला नाही तर चक्क पुरणपोळ्या देखील बनवल्या.
-
पुरणपोळ्या बनवण्याचा अनुभव रोहित पवारांनी सोशल मीडियावर पोस्टद्वारे शेअर केला आहे.
-
पोळी बनवण्याचा प्रयत्न केला. पण त्यात थोड्याफार प्रमाणातच यश आलं असल्याचं रोहित पवारांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
-
नागपूर दौऱ्यावर असताना काटोल येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रवीण मुनिराज राजणे यांच्या सोनोली येथील निवासस्थानी रोहित पवारांनी भेट दिली.
-
यावेळी राजणे कुटुंबीयांनी रोहित पवारांसाठी खास पुरणपोळीचा बेत केला होता.
-
“राजणे कुटुंबीयांनी आग्रहाने आणि आपुलकीने पुरणपोळ्या खाऊ घातल्या. एक वेगळ्या पद्धतीने बनवलेल्या या अप्रतिम चवीच्या पुरणपोळ्या खाऊन मन तृप्त झालं.”, असं रोहित पवारांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
-
(सर्व फोटो : रोहित पवार/ इन्स्टाग्राम)

अक्षय कुमारला व्याजासहित पैसे परत केल्यानंतर परेश रावल यांचं ‘ते’ ट्विट चर्चेत, म्हणाले, “माझ्या वकिलांनी…”