-
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पत्रा चाळ घोटाळ्या प्रकरणी ईडीने ताब्यात घेतले आहे. (Photo By Pavan Khengre)
-
ईडीच्या अधिकाऱ्यांनी आज (३१ जुलै) राऊत यांच्या मैत्री या बंगल्यावर छापा टाकला होता. या छापेमारीनंतर ईडीने त्यांना ताब्यात घेतले.(Photo By Pavan Khengre)
-
दरम्यान, राऊतांवरील कारवाईनंतर राज्यभरातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. (Photo By Pavan Khengre)
-
राऊतांवर करण्यात आलेल्या कारवाईच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी आज पुण्यातील सारसबाग येथे आंदोलन केले. (Photo By Pavan Khengre)
-
यावेळी शिवसैनिकांनी भाजपा तसेच ईडीविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. (Photo By Pavan Khengre)
-
संजय राऊतांच्या घरी तपास केल्यानंतर ईडीने काही कागदपत्रे तसेच साडे अकरा लाख रुपयांची रोकड सोबत जप्त केली आहे. (Photo By Pavan Khengre)
-
तपासादरम्यान, भांडूप येथील राऊतांच्या निवास्थानी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. (photo by Deepak Joshi)
-
कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी तसेच ईडीच्या पथकाने योग्य ती खबरदारी घेतली होती. (photo by Deepak Joshi)
-
ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत यांनी मी झुकणार नाही. शेवटपर्यंत शिवसेनेला सोडणार नाही. माझ्यावर करण्यात आलेले आरोप खोटे आहेत, अशी प्रतिक्रिया दिली. (photo by Deepak Joshi)
-
दरम्यान संजय राऊतांना ईडीडकडून अटक होण्याची दाट शक्यता आहे. (photo by Deepak Joshi)

सर्वार्थ सिद्धी योगाचा प्रभाव तुमच्या राशीच्या कुंडलीत काय बदल घडवणार? कोणाच्या दिवसाची सुरुवात चांगली होणार? वाचा तुमचे राशिभविष्य