-
झोया अग्रवाल या हिंदकुश पर्वतावरून बोईंग ७७७ विमान उडवणाऱ्या तसेच जगातील सर्वात लांब हवाई मार्गावर विमान उडवणाऱ्या पहिली महिल्या पायलट आहेत.
-
झोया अग्रवाल या मे २००४ पासून एअर इंडियामध्ये पायलट या पदावर आहेत. २०१३ मध्ये त्या एअर इंडियाच्या बोईंग ७७७ विमान उडवणाऱ्या पहिल्या सर्वात तरुण महिला पायलट आहेत.
-
झोया अग्रवाल यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून विज्ञान शाखेतून आपले शिक्षण पूर्ण केले.
-
२०२१ मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली एअर इंडियाच्या सर्व महिला पायलट टीमने प्रथमच अमेरिकेतील सॅन फ्रान्सिसो (SFO) ते बेंगळुरूपर्यंतचा जगातील सर्वात लांब हवाई मार्ग असा प्रवास केला होता.
-
झोया अग्रवाल यांच्या कामगिरीने जोरावर त्यांना SFO एव्हिएशन म्युझियममध्ये स्थान मिळाले आहे.
-
दरम्यान, यानंतर झोया अग्रवाल यांनी प्रतिक्रिया दिली. “मला विश्वास बसत नाही की मी यूएसएमधील संग्रहालयात स्थान मिळवणारी पहिली भारतीय महिला आहे. अमेरिकेने एका भारतीय महिलेला त्यांच्या संग्रहालयात स्थान देणं हा माझ्यासाठी आणि माझ्या देशासाठी मोठा सन्मान आहे.”, असे त्या म्हणाल्या.

कधीच गॅस होणार नाही, पोटात कुजलेली सगळी घाण येईल बाहेर; आठवड्यातून एकदा फक्त ‘ही’ फळं खा