-    सोलापूरमधील प्रसिद्ध उद्योजक अभिजीत पाटील यांच्या विविध कारखान्यांवर आयकर विभागाने गुरुवारी (२५ ऑगस्ट) सकाळी साडेसहा वाजता धाड टाकली. 
-    त्यानंतर आता ३४ तास होऊनही त्यांच्या कारखान्यांची चौकशी सुरूच आहे. 
-    अभिजीत पाटील यांनी २० वर्षांपासून बंद असलेला सांगोल्याचा साखर कारखाना चालवण्यासाठी घेतल्यानंतर त्यांच्या नावाची जोरदार चर्चा झाली. 
-    याशिवाय पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादीच्या भालके गटाला धक्का देत २१ पैकी २० जागा जिंकल्यानंतर ते खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आले. 
-    मात्र, आता याच अभिजीत पाटलांवर आयकर विभागाने छापे टाकल्यानंतर पुन्हा एकदा त्यांचं नाव चर्चेत आलं आहे. 
-    विशेष म्हणजे याआधी तुकाराम मुंढेंनी अभिजीत पाटलांच्या वाळू तस्करीवर धडक कारवाई केली होती. 
-    तुकाराम मुंढेंनी केलेल्या कारवाईनंतर अभिजीत पाटील यांना तीन महिने तुरुंगवासही झाला. 
-    तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अभिजीत पाटील यांनी आपल्या व्यवसायाचा मार्ग बदलला आणि ते साखर कारखानदारीत आले. 
-    सध्या अभिजीत पाटलांकडे धाराशीव साखर कारखाना, चोरखडी (उस्मानाबाद), धाराशीव साखर कारखाना युनिट २ (लोहा, नांदेड), वसंतदादा साखर कारखाना विठेवाडी, चांदवड, नाशिक आणि सांगोला शेतकरी सहकारी साखर कारखाना (पंढरपूर, सोलापूर) या चार कारखान्यांची मालकी आहे. शिवाय विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर त्यांचं नियंत्रण आहे. 
-    यानंतर आता आयकर विभागाने धाडी टाकल्यानंतर अभिजीत पाटील पुन्हा तुरुंगात जाणार की यातून सुटणार याबाबत अनेत तर्कवितर्क लावले जात आहेत. 
 
  “मुघलांना विरोध करणारे मराठा साम्राज्य…”, मराठी भाषेच्या वादावर JNU च्या कुलगुरूंची प्रतिक्रिया; म्हणाल्या… 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  