-    करोना महामारीनंतर तब्बल दोन वर्षांनी राज्यातील गणेशोत्सव कोणत्याही निर्बंधांविना मोठ्या धुमधडाक्यात साजरा होत आहे. 
-    गणेशोत्सवाची खास परंपरा असलेली मुंबईतील लालबागनगरी भक्तांनी गजबजून गेली आहे. 
-    आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करत आहेत. 
-    भाविकांचे श्रद्धास्थान आणि नवसाला पावणारा अशी ख्याती असलेला बाप्पा म्हणजे लालबागचा राजा. 
-    लालबागचा राजाच्या दर्शनासाठी मुंबईबाहेरूनही भाविक येत असतात. 
-    करोनामुळे यंदा दोन वर्षांनंतर बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक राजाच्या दरबारात गर्दी करत आहेत. 
-    अनेक सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांनीही लालबागचा राजाचे दर्शन घेण्यासाठी हजेरी लावली. 
-    दरवर्षी लालबागचा राजाच्या दानपेटीतही भाविकांकडून मोठी रक्कम देणगी स्वरुपात जमा होते. 
-    यंदा पहिल्या पाच दिवसांत बाप्पाच्या दानपेटीत कोट्यवधी रुपयांची देणगी जमा झाली आहे. 
-    टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार राजाच्या दानपेटीत दोन कोटी ४९ लाख ५० हजार रोख रक्कम देणगी स्वरुपात जमा झाली आहे. 
-    याशिवाय २५० तोळे सोने आणि २९ किलो चांदीचे दान बाप्पाच्या चरणी भाविकांनी अर्पण केले आहेत. 
-    येत्या दिवसांत राजाच्या दानपेटीत आणखी देणगी जमा होईल. 
-    दरवर्षी लालबागचा राजाच्या दानपेटीत किती देणगी जमा होते याची अधिकृत माहिती मंडळाकडून दिली जाते. 
-    (सर्व फोटो : लालबागचा राजा/ इन्स्टाग्राम ) 
 
  पाकिस्तान नरमला! भारताबरोबर चर्चेची तयारी; भारत मात्र फक्त पाकव्याप्त काश्मीर परत मिळवण्याच्या चर्चेवरच ठाम 
   
  
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  