-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी भेट म्हणून देण्यात आलेल्या एकूण १२०० भेटवस्तूंचा लिलाव करण्यात येणार आहे.
-
यामध्ये शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवलेला नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा तसेच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्यांनी मोदी यांना भेट दिलेल्या भेटवस्तूंचाही समावेश आहे.
-
या भेटवस्तू दिल्लीमधील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे प्रदर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत.
-
या चित्रात इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशन (IBA) महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२२ मध्ये भारताच्या बॉक्सर्सनी वापरलेले बॉक्सिंग ग्लोव्हज दिसत आहेत.
-
२०२२ साली म्हणजे याच वर्षी झालेल्या राष्ट्रकूल स्पर्धेसाठी खेळाडूने वापरलेली जर्सीदेखील लिलावासाठी ठेवण्यात आली आहे.
-
याबाबतची अधिका माहिती क्रीडा मंत्रालयाने दिली आहे. या लिलावात क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींच्या २५ विशेष भेटवस्तूंचा समावेश असेल.
-
१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधित या वस्तू सर्वसमान्यांना पाहता येणार आहेत. आजपासूनच या भेटवस्तूंच्या लिलावास सुरुवात झालेली आहे.
-
मोदी यांना मिळालेल्या वेगवेगळ्या भेटवस्तूंच्या लिलावाची ही चौथी वेळ आहे. सांस्कृतिक मंत्रालयाने सांगितल्याप्रमाणे या लिलावात १२०० पेक्षा जास्त वस्तूंचा समावेश आहे.
-
pmmementos.gov.in या वेबसाईटवर हा लिलाव आयोजित केला जात असून लिलाव प्रक्रिया २ ऑक्टोबर संपुष्टात येईल. गंगा नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी निधी उभारण्यासाठी मोदी यांनी त्यांना मिळालेल्या सर्व भेटवस्तूंचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी या लिलाव प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी यांनी केली आहे.

Nikki Haley : निकी हॅले यांचं वक्तव्य; “चीनला सूट देऊन अमेरिकेने भारताशी हितसंबंध बिघडवू नये, अन्यथा..”