-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षात उभी फूट पडली.
-
शिवसेनेमध्ये शिंदे आणि उद्धव ठाकरे समर्थक असे उघड दोन गट पडले असून दोन्ही बाजूंचे नेते एकमेकांवर कठोर शब्दातं टीका करताना दिसत आहेत.
-
दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही गटांतील संघर्ष तीव्र झाला आहे. शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकमेकांवर जाहीर टीका करताना दिसत आहेत.
-
मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्यासाठी दोन्ही गाटांमध्ये चढाओढ लागली आहे. मात्र महापालिकेने या मैदानावर मेळावा घेण्यास दोन्ही गटांना परवानगी नाकारल्यामुळे उद्धव ठाकरे गटाने न्यायालयाचे दार ठोठावले आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतरच शिवाजी पार्कवर कोण मेळावा घेणार हे नेमकेपणाने ठरेल.
-
दरम्यान औरंगाबाद शहरात विजयकुमार साळवे यांच्यासह काही स्थानिक नेते, कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी या कार्यकर्त्यांच्या हाती शिवबंधन बांधले.
-
विजयकुमार साळवे काही वर्षांपूर्वी भाजपमध्ये कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
-
माजी शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळलेल्या साळवे यांचे शहरात अनेक ठिकाणी मोठे फलक लावलेले आहेत.
-
भाजपा, राष्ट्रवादी आणि आता शिवसेना असा त्यांचा राजकीय प्रवास आहे.
-
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धांचे आयोजन केले होते. आता त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
बाळाला स्तनपान करणाऱ्या आईला पाहून कॅबचालकाची ‘ती’ कृती ठरली लक्षवेधी; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक