-
राष्ट्रवादी काँग्रेचे आमदार रोहित पवार यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत ”शिवसेना फोडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पुढील लक्ष्य असू शकतं” असे विधान केले होते.
-
रोहित पवारांचे हे विधान सध्या चर्चेचा विषय बनले आहे. यावरून अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
-
“भाजपा संपूर्ण देशात प्रादेशिक पक्ष संपवण्याचे काम करते आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपवण्याचा त्यांनी अनेकदा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडायसाठी त्यांनी १० जन्म घेतले तरी आमचा पक्ष काही फुटणार नाही”, असे ते म्हणाले.
-
पुण्यात पत्रकारांशी बोलताना, त्यांनी शेतकऱ्यांच्या मुद्यांवरूनही शिंदे सरकारवर जोरदार टीका केली.
-
“आज राज्यात शेतकऱ्यांवर वाईट परिस्थिती आहे. परतीच्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, या सरकारचे कृषीमंत्री तर सोडा, इतर मंत्रीदेखील कुठं फिरताना दिसत नाहीत.” असे ते म्हणाले.
-
“हे सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी सत्तेत आलेलं नाही, तर केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी सत्तेत आले आहे. त्यांना स्वार्थाशिवाय त्यांना काहीही दिसत नाही”, असा टोलाही त्यांनी शिंदे सरकारला लगावला आहे.
-
“मी तीन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिले असून शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्याची मागणी केली”, अशी माहितीही त्यांनी दिली.
-
“या सरकारला शेतकऱ्याचे नुकसान दिसत नाही, मंत्र्यांनी प्रवास करावा की न करावा, हे त्यांना माहिती नाही. विरोधी पक्ष जेव्हा एखादी मागणी करतो, त्याकडे जाणीवपूर्वक राजकारण म्हणून दुर्लक्ष करणे, हे राज्याच्या संस्कृतीला परवाडणारे नाही”, असेही ते म्हणाले.
-
“परतीच्या पावसामुळे पावसामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील शेकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, कोणतीही विमा कंपनी याबाबत शेतकऱ्यांना दिलासा द्यायला तयार नाही”, असेही ते म्हणाले.
-
“महाविकास आघाडीच्या सरकारच्या वेळेस अशीच परिस्थिती होती. त्यावेळी पूरस्थितीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्या शेतकऱ्यांना आम्ही तत्काळ अनुदान दिले होते”, असे ते म्हणाले.
-
“दिवाळी निमित्ताने ज्या शिधा वाटपाची घोषणा केली आहे, ती शिधा जनतेपर्यंत पोहोचणारी नाही. ही केवळ दिवाळीच्या तोंडावर केलेली लोकप्रिया घोषणा आहे.”
-
“आज अनेक जण आम्हाला येऊन सांगतो आहे, दिवाली तोंडावर आली. मात्र, आम्हाला अद्यापही शिधा मिळालेला नाही”, असेही ते म्हणाले.
दिवाळीआधीच ‘या’ ३ राशी होतील कोट्यधीश! शुक्राच्या गोचरामुळे तिजोरीत पैशांची वाढ तर करिअर धरणार सुस्साट वेग