-
दरवर्षी प्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैनिकांबरोबर दिवाळी साजरी केली. यंदाची दिवाळी त्यांनी जम्मू-काश्मीरमधील कारगिल द्रास येथे भारतीय सैनिकांबरोबर साजरी केली आहे.
-
यावेळी त्यांनी सैनिकांशी संवाद साधला. तसेच यावेळी सैनिकांना संबोधित करताना भारतीय जवान हेच माझे कुटुंबीय आहेत. यापेक्षा गोड दिवाळी असू शकत नाही, असे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
-
कारगिलची ही भूमी सामर्थ्याचे प्रतिक आहे. या भूमिला नमन करण्याची भावना मला पुन्हा पुन्हा येथे घेऊन येते.
-
तुमच्यामध्ये आल्यानंतर माझी दिवाळी आणखी गोड होते. माझ्या दिवाळीचा उत्साह तुमच्याजवळ आहे.
-
मला मागील कित्येक वर्षांपासून तुमच्यासोबत दिवाळी साजरी करता येते. हे माझे सौभाग्यच आहे, असे नरेंद्र मोदी सैनिकांना उद्देशून म्हणाले.
-
तसेच, आम्ही युद्ध टाळण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला आहे. मात्र शांती ही सामर्थ्याशिवाय शक्य होत नाही.
-
कोणी वाकडी नजर करून पाहण्याचा प्रयत्न केला, तर भारतीय सैन्य त्यांना जशास तसे उत्तर देण्यास समर्थ आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
-
आपल्यासाठी युद्ध हा कधीच पहिला पर्याय नाही. आपल्या वीरतेमुळे, संस्कारामुळे आपण युद्धाला नेहमीच शेटचा पर्याय समजलेले आहे. लंका किंवा कुरुक्षेत्र असो, येथे आपण नेहमीच युद्ध टाळण्याचा प्रयत्न केलेला आहे, असेही नरेंद्र मोदींनी म्हटलं.
-
तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी जवांनाबरोबर ‘वंदे मातरम’ गाणंही गायलं आहे.

“मी ती रात्र कधीच विसरणार नाही…”, सुनील शेट्टीने ‘बॉर्डर’ चित्रपटाच्या शूटिंगची सांगितली आठवण; म्हणाला, “सुहागरातच्या सीनमुळे मी…”