-
येत्या एका महिन्यात २०२२ वर्ष संपून नवीन वर्ष उजाडेल. मात्र, या वर्षभरात जगाने अनेक वाईट घटनांचा सामना केला आहे. या दुर्घटनामध्ये अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे.
-
युक्रेनमधील मायकोलायव्हमध्ये बॉम्बस्फोटामुळे नुकसान झालेल्या बस स्टॉपवर एक महिला वाट पाहत आहे. लोकसंख्येपैकी अर्ध्याहून अधिक रशियन हल्ल्यांनंतर शहर सोडून पळून गेले आहेत. (एपी)
-
गुजरातमधील मोरबीत झुलता पूल कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत १३५ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ५५ लहान मुलांचा समावेश होता. (फोटो – निर्मल हरिंद्रन एक्सप्रेस )
-
मोरबी पूल कोसळल्याप्रकरणी आत्तापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली असून त्यात ओरेवा ग्रुपचे दोन व्यवस्थापक, दोन कंत्राटदार, दोन तिकीट बुकींग क्लर्क आणि तीन सुरक्षा रक्षक यांचा समावेश आहे. नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनाही निलंबित करण्यात आले आहे. (निर्मल हरिंद्रन एक्सप्रेस फोटो)
-
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर २ नोव्हेंबर रोजी गोळीबार करण्यात आला होता. ते एका मोर्चात सहभागी झाले होते, यावेळी त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यात इम्रान खान यांच्यावर उजव्या पायाला दुखापत झाली आहे.
-
हल्ल्यानंतर इम्रान खान यांच्या समर्थकांनी या घटनेचा निषेध करत रस्त्यावर आंदोलने केली. अनेकांनी जाळपोळ करत महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला.
-
श्रीलंका गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक संकटाने ग्रासलेला आहे आणि त्यातही सत्ताबदल झाला आहे. मात्र, सत्ताबदलानंतरही श्रीलंकेतील वातावरण शांत होण्याचं नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे. विरोधी पक्षांसह कामगार संघटना, विद्यार्थी चळवळी आणि नागरी संघटना सरकारविरोधात रस्त्यावर उतल्या आहेत
-
दक्षिण कोरियात सोलमध्ये हॅलोविन सण साजरा करताना वाढलेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत १५१ लोक ठार तर ८२ इतर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करताना एक व्यक्ती
-
डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोच्या पूर्वेकडील उत्तर किवू प्रांताची राजधानी गोमा येथे मोठा हिंसाचार झाला. या हिंसाचारात बंडखोरांनी आजूबाजूचा परिसर पेटवून दिला होता या प्रदेशात २०१२ पासून M23 बंडखोर आणि सरकारी सैन्य यांच्यात लढाई सुरू आहे.
-
डाव्या विचारसरणीचे नेते लुईझ इनॅसिओ लुला दा सिल्वा यांची ब्राझीलच्या अध्यक्षपदी निवड झाली. ब्राझीलच्या अध्यक्षपदी ते तिसऱ्यांदा विराजमान झाले आहेत. ब्राझीलचे माजी अध्यक्ष जैर बोल्सोनारो पराभव करत ते विजयी झाले आहेत.
-
देशाची राजधानी दिल्लीत प्रदुषणाची पातळी वाढली आहे. वाढत्या प्रदुषणामुळे दिल्लीतील शाळांना सुट्टी देण्यात आली असून अनेक कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हवेतील वाढते धुके कमी करण्यासाठी पाण्याचा मारा करण्यात येत आहे.

Israel Iran Conflict : इराणचा इस्रायलवर पलटवार! जेरुसलेम, तेल अवीवसह अनेक शहरांवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे; आयर्न डोम फेल?