-
ठाण्यातील विवियाना मॉलमधील चित्रपटगृहात झालेल्या राड्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती.
-
त्यानंतर न्यायालयाकडून आव्हाड आणि कार्यकर्त्यांची जामिनावर सुटका झाली. त्यात ७२ तासांमध्येच जितेंद्र आव्हाडांवर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. एका महिलेने आव्हांडाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
-
त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आपला राजीनामा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सुपूर्द केला आहे. तसेच, आपली भूमिका मांडली आहे.
-
जितेंद्र आव्हाड म्हणाले, ३०७, ३२३, ३२३ हे सगळे गुन्हे मला मान्य हे माझ्याहातून घडले आहेत आणि घडू शकतात.
-
पण, ३५४ सारखा विनयभंगाचा गुन्हा अमान्य असून, जो मी आयुष्यात कधी केला नाही. पोलिसांनी हा गुन्हा कसा काय नोंद केला.
-
समाजात माझी मान खाली जाईन, अशा पद्धतीचा गुन्हा नोंदवायचा हा षडयंत्राचाच भाग असू शकतो. त्यामुळे राजकारण करावं आम्हीही केलं, पण आमदार आणि पक्षांमध्ये भेदभाव नाही केला.
-
‘हर हर महादेव’ प्रकरणी झालेल्या गुन्हाचं मला काही बोलायचं नाही. इतक्या खालचं राजकारण सुरु आहे. त्यापेक्षा यात न राहिलेलं बरं. मला त्या कलमाबद्दल वाईट वाटलं. माझ्या खुनाचा कट रचला असता, काही वाटलं नसते.
-
३५४ कलम मनाला लागलं. ३५४ आणि ३७६ साठी मी जन्माला आलो नाही.
-
राजकारणात आक्रमकपणा नवा नाही. खालच्या पातळीवरील राजकारण महाराष्ट्रात होऊ नये. घरे उद्ध्वस्त होतील, असेही आव्हाड यांनी म्हटलं.
बापरे! २०२६ मध्ये सोन्याचा दर किती असेल? सोन्याच्या किंमतीबाबत बाबा वेंगाने केलेले भाकित जाणून धक्का बसेल