-
जत तालुक्यातील काही गावांनी कर्नाटकमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा दाव्यावरुन महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक, असा नवीन वाद निर्माण झाला आहे.
-
या वादावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना कारवार, निप्पाणी, बेळगावचा उल्लेख करत गावांची मागणी कर्नाटकने करणं योग्य नसल्याचं म्हटलं.
-
मात्र, त्याचवेळी पवार यांनी मागील अनेक दशकांपासून चालू असलेल्या सीमाप्रश्नाचा उल्लेख करताना चर्चेतून मार्ग निघू शकतो असे संकेत देताना कारवार, निप्पाणी, बेळगाव देण्याचा विचार असेल तर काहीतरी बोलता येईल, अशा अर्थाचं विधान केलं आहे.
-
तसेच, राज्यपाल या पदावर बसणाऱ्या वक्तीने जबाबदारीने बोलण गरजेचं असते. सध्याच्या राज्यपालांनी अनेकवेळ अशी वक्तव्ये केली, तेव्हा आम्ही त्या पदाची गरिमा राखण्यासाठी काही बोललो नाही.
-
पण, आता शिवाजी महाराज यांच्याबद्दल वक्तव्य करणे योग्य नसल्याचे शरद पवार यांनी सांगितलं. राज्यपालांच्या वक्तव्याबाबत राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी याची दखल घ्यायला हवी, असेही पवार यांनी म्हटलं.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी शिर्डीच्या दौऱ्यावर असताना एका ज्योतिषाकडून भविष्य जाणून घेतल्याची चर्चा आहे. यावरून शरद पवारांनी टोला लगावला आहे.
-
दैनंदिन काम सोडून देवदर्शन करणे आणि ज्योतिषाला हात दाखवणे, ही म्हणजे आत्मविश्वासाला धक्का बसल्याची लक्षणे आहेत.
-
जेव्हा आत्मविश्वास डळमळीत होतो तेव्हा लोक अशा गोष्टींकडे वळतात, अशा शब्दांत शरद पवार यांनी मुख्यमंत्री शिंदेंना टोला लगावला.
-
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हांड यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांवरही शरद पवार यांनी भाष्य केलं. लोकप्रतिनिधीच्या कामात अडथळा आणून, त्याला नाउमेदक केलं जात आहे. सत्तेचा गैरवापर करून गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.
-
या सगळ्याला जितेंद्र आव्हाड कधी बळी पडणार नाही. आपल्या विचाराच्या लढ्याला आव्हाड तडजोड करणार नाहीत, असे शरद पवार म्हणाले.
-
श्रद्धा वालकर खून आणि महिलांवरील अत्याचार यावर बोलताना शरद पवार म्हणाले, महागाई, राज्यात आणि देशात महिलांवर वाढते अत्याचार यावर आम्ही पक्षाच्या बैठकीत चर्चा करणार आहोत.
-
हा विषय खूप गंभीर आहे. त्याकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही, असं म्हणत शरद पवारांनी श्रद्ध वालकर खून प्रकरणावर आपलं मत व्यक्त केलं.

Kidney Disease Early Signs: किडनी खराब व्हायला लागल्यास त्वचेवर दिसतात ‘ही’ ६ लक्षणे, आरशात दिसणारे बदल वेळीच ओळखा, नाहीतर सायलेंट किलर..