-    राज्यात मराठी नववर्ष आणि गुढी पाडव्याचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं जात आहे. 
-    या निमित्ताने मुंबई आणि उपनगरांसह राज्याच्या अनेक भागांत काढल्या शोभायात्रा काढण्यात येत आहेत. 
-    मुंबईतील वाशी येथेही गुढीपाडवानिमित्त शोभायात्रा काढण्यात आली होती. 
-    यावेळी नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत होता. 
-    या शोभायात्रेत महिला पारंपारिक वेशभूषा करून सहभागी झाल्या होत्या. 
-    तसेच लहान मुलीदेखील नऊवारी साडी नेसून शोभायात्रेत सहभागी झाल्याचं दिसून आलं. 
-    यावेळी महिलांनी हाती लेझीम घेऊन नृत्य सादर केले. 
-    तसेच अनेक तरुणींनी ढोल वाजवत मराठी नवीन वर्षाचं स्वागत केलं. 
-    दरम्यान, मुंबईतील गिरगावातही गुढीपाडव्याचा उत्साह दिसून आला. 
-    गिरगावात चैत्र नवरात्र निमित्त देवीच्या मुर्तीसह शोभायात्रा काढण्यात आली होती. 
-    यावेळी अबालवृद्धांचा उत्साह ओसंडून वाहत होता. 
-    यावेळी विविध संदेश देणारे पोस्टर्सदेखील बघायला मिळाले. 
 
  १२ महिन्यांनंतर अखेर ‘या’ राशींचं भाग्य उजळणार; गडगंज श्रीमंतीसोबतच करिअरमध्ये होणार प्रगती, पिढ्यानुपिढ्या समृद्ध होणार 
   
  
  
  
  
  
  
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  