-
उत्तर प्रदेशमधील कुख्यात गुंड अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
-
दोघांनाही वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात असताना प्रयागराज वैद्यकीय महाविद्यालयाजवळ त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्यात दोघांचाही मृत्यू झाला.
-
गुंड अतिक अहमद हा २००५ मधील बसपा आमदार राजू पाल हत्याकांड आणि फेब्रुवारीमध्ये झालेल्या उमेश पाल हत्याकांडातील प्रमुख आरोपी होता.
-
अतिक अहमदवर उत्तर प्रदेशमध्ये १०० पेक्षा जास्त गुन्ह्यांची नोंद आहे. यामध्ये खून, खंडणी अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे.
-
अतिक अहमदचा जन्म १० ऑगस्ट १९६२ रोजी झाला. अतिकचे वडील फिरोज अहमद आपल्या कुटुंबासह अलाहाबादच्या चकिया परिसरात राहत होते. ते आपला उदरनिर्वाह करण्यासाठी टांगा चालवत असत.
-
अतिकला शिक्षणाची फारशी आवड नव्हती. त्याने १९७९ मध्ये वयाच्या १८ व्या वर्षी पहिला खून करत गुन्हेगारी विश्वात पाऊल ठेवले.
-
२१-२२ व्या वर्षी अतिक अलाहाबादमधील चकियाचा परिसरात मोठा गुंड बनला होता. तसेच त्याने खंडणीचा धंदा सुरू केला होता.
-
पुढे अतिक अहमद गुन्हेगारीच्या जगातून राजकारणाकडे वगळा. १९८९मध्ये अतिकने अलाहाबाद पश्चिम मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्याचा विजय झाला.
-
त्यानंतर याच जागेवर त्याने सपा आणि अपना दलाच्या तिकीटांवरही निवडणूक लढवली.
-
अतिकने २००४ साली फुलपूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली. याच जागेवरून पंडित नेहरू यांनीही निवडणूक लढवली होती.
-
२००७ मध्ये त्याने समाजवादी पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवली, मात्र, त्याचा पूजा पाल यांनी पराभव केला.
-
पुढे उमेश पाल हत्याकांडात त्याला अटक करण्यात आली. तसेच त्याला २८ मार्च रोजी दोषी ठरवण्यात आले. दरम्यान, शनिवारी त्याला वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना त्याची हत्या करण्यात आली.

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल