-
Bengaluru CEO Killed 4 Year Old Son Update: बंगळुरू स्थित आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) स्टार्टअपच्या सीईओ सूचना सेठ हिच्यावर स्वतःच्या चार वर्षांच्या मुलाची हत्या केल्याचा आरोप आहे.
-
इंडियन एक्सस्प्रेसने पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी सुचना सेठ हिला कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातून तिच्या मुलाचा मृतदेह पिशवीत भरून टॅक्सीमधून पळून जाण्याचा प्रयत्न करताना पकडण्यात आले होते
-
हाऊस-कीपिंग कर्मचार्यांपैकी एक जण सोमवारी अपार्टमेंट स्वच्छ करण्यासाठी गेला असताना त्याला काही रक्ताचे डाग दिसले. त्यानंतर कलंगुट पोलिसांच्या एका तुकडीला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. गोवा पोलिसांनी कॅब चालकाशी संपर्क साधला आणि आरोपीशी फोनवर बोलून तिच्या मुलाची चौकशी केली
-
कॉलवर सूचनाने आपला मुलगा गोव्यात फातोर्डा येथे मित्रांबरोबर आहे असे सांगितले, तिची उत्तरे अस्पष्ट आणि संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी चालकाला कॅब कर्नाटकातील जवळच्या पोलीस ठाण्यात नेण्यास सांगितलं जिथे पोलिसांना मुलाचा मृतदेह तिच्या पिशवीत सापडला
-
ड्रायव्हरने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ७ जानेवारीला रात्री ११ वाजता त्याला हॉटेल सोल बनयान मधून कॉल आला होता. ३०,००० रुपये भांडे मंजूर झाले होते, साधारण सकाळी ११ वाजता त्याला पोलिसांचा कॉल आला होता. ज्यांनी त्याला गाडी चित्रदुर्ग पोलीस स्टेशनला नेण्यास सांगितले
-
आतापर्यंत या प्रकरणात तब्बल १५ जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. पोलिसांनी तपासात गोव्यातील सर्व्हिस अपार्टमेंटमधील एक उशी, तिची सुटकेस आणि रक्ताने माखलेला टॉवेल, कटलरी (भांडी) यासह मुख्य पुरावे जमा केले आहेत. सूचनाने याच खोलीत आपल्या आयलायनरने लिहून ठेवलेली एक चिठ्ठी सुद्धा पोलिसांनी सापडली होती
-
डॉ कुमार नाईक यांनी शवविच्छेदन अहवालात दिलेल्या माहितीनुसार, चार वर्षांच्या मुलाच्या तोंडावर उशी किंवा जाड कापड ठेवून मारण्यात आले ज्यात त्याचा श्वास कोंडून गुदमरून मृत्यू झाला असे कारण समोर आले होते. मृतदेह हाती येण्याच्या ३६ तास आधीच मुलाचा मृत्यू झाला होता असेही सांगण्यात आले आहे.
-
पोलिसांनी सांगितले की, उत्तर गोव्यातील कँडोलिम येथील हॉटेलमध्ये कफ सिरपच्या दोन रिकाम्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. यावरून मारण्याआधी सूचनाने मुलाला कफ सिरप दिले असण्याची शक्यता आहे. बुधवारी सकाळी सूचनाचा पती व्यंकटरमण याने मुलाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले होते
-
पोलिसांना सूचनाच्या खोलीत सर्वात महत्त्वाचा पुरावा आढळला होता आणि तो म्हणजे एका टिश्यू पेपरवर तिने आय लायनरच्या मदतीने लिहिलेली नोट, हा टिश्यू चुरगळलेल्या अवस्थेत सापडला होता, त्यावरील पाच ओळींचा उलगडा पोलिसांना झाला होता ज्यानुसार मुलाचे हक्क तिच्या पतीकडे (व्यंकट रमण) जाणे तिला आवडणार नव्हते. शिवाय पोलिसांच्या चौकशीतही सूचनाने पतीसह बिघडलेल्या नात्याविषयी भाष्य केले होते
-
२०१० मध्ये सूचना व व्यंकट यांचं लग्न झालं होतं. २०१९ मध्ये त्यांना मुलगा झाला. २०२० पासून सूचना आणि पतीमध्ये वाद होऊ लागले. हे प्रकरण कोर्टातही गेलं होतं. कोर्टाने सांगितलं की रविवारच्या दिवशी वडील मुलाला भेटू शकतात. मात्र पतीने मुलाला भेटू नये म्हणून या महिलेने मुलाला संपवलं आणि स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केला असा पोलिसांचा अंदाज होता.
-
सूचनाने ८ऑगस्ट २०२२ रोजी तिचा पती व्यंकटरमण पीआर विरुद्ध घरगुती हिंसाचाराचा खटला दाखल केला होता. मात्र तिच्या पतीने कोर्टात आरोप नाकारले होते. हा खटला अजूनही चालू आहे आणि १२ डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या शेवटच्या सुनावणीच्या वेळी मुलाच्या वडिलांनी आईला २०,००० रुपये भरपाई म्हणून दिले होते आणि न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी २९ जानेवारी २०२४ पर्यंत पुढे ढकलली होती.
-
घटना घडली त्यादिवशी सूचनाचा पती व्यंकट रमण हा इंडोनेशियाला कामानिमित्त गेला होता. घटनेपूर्वी रमण यांनी सूचनाला फोन करून रविवारी मुलाला बंगळुरू येथील घरी आणण्यास सांगितले होते. मात्र, सूचनाने आपल्या पतीची विनंती नाकारली आणि त्याऐवजी एखाद्या सार्वजनिक ठिकाणी भेटण्यास सांगितले. भेटीच्या ठिकाणी सूचना मुलाला घेऊन आलीच नाही शेवटी व्यंकट रमण कामासाठी इंडोनेशियाला निघून गेले
-
सूचना यांनी हत्या केल्याचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. जेव्हा मी झोपेतून उठले तेव्हा अगोदरच तिच्या मुलाचा मृत्यू झालेला होता असा दावा त्यांनी केला आहे. सध्या सूचना यांना २० जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे
-
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार कलंगुट पोलीस ठाण्यात सूचना व पती व्यंकट यांची भेट झाली होती यावेळी सुद्धा दोघांमध्ये बाचाबाची झाली. सूचनाने या घटनेसाठी व्यंकटला जबाबदार सांगत मी पोलीस कोठडीत आहे तोपर्यंतच तू मोकळा आहेस अशी धमकी सुद्धा दिली आहे
-
सूचना ‘द माइंडफुल एआय लॅब’च्या सीईओ आहे आणि तिच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, ती एक AI एथिक्स तज्ज्ञ आणि डेटा सायंटिस्ट आहे, तिला डेटा सायन्स टीम्सचे मार्गदर्शन करण्याचा आणि स्टार्टअप्स आणि उद्योग संशोधनामध्ये मशीन लर्निंग सोल्यूशन्स स्केलिंग करण्याचा १२ वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. (सर्व फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

बाई…कसली नाचली! ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर तरूणीने धरला ठेका; VIDEO पाहून कराल कौतुक