-
दोन दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातल्या २० लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. या यादीत नागपूरमधून नितीन गडकरींना तिकिट देण्यात आलं आहे. (सर्व फोटो सौजन्य-अमित वानखेडे, इंस्टाग्राम पेज )
-
पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचा हा फोटोही व्हायरल झाला आहे.
-
जालना लोकसभा मतदारसंघातून रावसाहेब दानवे यांना तिकिट देण्यात आलं आहे. लोकसभेची लढाई असं म्हटलं जातं. दानवे यांचा लूक योध्यासारखाच आहे.
-
सुधीर मुनगंटीवार हे विद्यमान सरकारमध्ये मंत्री आहेत. त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली नसती तरीही चालणार होतं. पण त्यांना चंद्रपूरमधून तिकिट देण्यात आलं आहे.
-
सुजय विखे पाटील यांना अहमदनगरमधून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी तुम्ही मला लोकसभेला पाठवून दूर केलंत असं वक्तव्य केलं होतं.
-
पंकजा मुंडे यादेखील राज्याच्या राजकारणातून देशाच्या राजकारणात जात आहेत. कारण बीडमधून त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. धनंजय मुंडेंमुळे मी भरघोस मताधिक्क्याने निवडून येईन असा विश्वास पंकजा मुंडेंनी व्यक्त केला आहे.
-
पियूष गोयल यांना मुंबईतून तिकिट देण्यात आलं आहे. गोपाळ शेट्टी यांचं तिकिट कापून पियूष गोयल यांना देण्यात आलं आहे. या जागेवरुन पियूष गोयल निवडून येतील का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे.

Manoj Jarange : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय