-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे त्यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळानेदेखील शपथ घेतली. नरेंद्र मोदींच्या नवीन कॅबिनेट मंत्र्यांमध्ये मंत्री म्हणून ७ महिलांना जागा मिळाली आहे. (@Rakshatai khadse/FB)
-
ज्यामध्ये निर्मला सीतारामन, अन्नपूर्णा देवी, रक्षा खडसे, सावित्री ठाकूर, अनुप्रिया पटेल निमुबेन बंभानिया आणि शोभा करंदलाजे यांचा समावेश आहे. (@Rakshatai khadse/FB)
-
या ७ महिलांच्या संपत्ती बद्दल जर सांगायचे झाले तर या सर्वांमध्ये रक्षा खडसे सर्वाधिक श्रीमंत आहेत. रक्षा खडसे महाराष्ट्रातील रावेर मतदारसंघातून खासदार निवडून आल्या आहेत. (@Rakshatai khadse/FB)
-
रक्षा महाराष्ट्रातील ज्येष्ठ राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या सून आहेत. एकनाथ खडसे यांचे चिरंजीव निखिल खडसे यांनी २०१३ मध्ये स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली होती. (@Rakshatai khadse/FB)
-
Myneta. Info या वेबसाईटच्या माहितीनुसार रक्षा खडसे यांची एकूण मालमत्ता १८ कोटी रुपये इतकी आहे. मोदी मंत्रिमंडळातील ७ महिलांपैकी सर्वाधिक संपत्ती ही रक्षा खडसे यांच्याकडेच आहे. (@Rakshatai khadse/FB)
-
त्यांच्या नावावर विविध बँक खात्यांमध्ये ३ कोटी ४९ लाख २८ हजार ३०७ रुपये जमा आहेत. याशिवाय रक्षा खडसे यांनी ३ कोटी ७६ लाख ८७ हजार ९३२ रुपये विविध कंपन्या, बॉण्ड्स, डिबेंचर आणि शेअर बाजारामध्ये गुंतवले आहेत. (@Rakshatai khadse/FB)
-
२ कोटी रुपयांपेक्षाही जास्त किंमतीच्या रक्षा खडसे यांनी एलआयसी आणि अन्य कंपन्यांच्या विमा पॉलिसी घेतल्या आहेत. त्यांच्या नावे ७७ लाख रुपयांचे कर्ज देखील आहे. (@Rakshatai khadse/FB)
-
रक्षा खडसे यांच्याकडे बरीच शेती असून, ५ कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीची आहे. याशिवाय ८ कोटी ३३ लाख २ हजार रुपये इतक्या किमतीची बिगरशेती जमीन सुद्धा त्यांच्याकडे आहे. (@Rakshatai khadse/FB)
-
खासदार रक्षा खडसे यांच्याकडे महाराष्ट्रातील जळगाव मध्ये ९२ लाख रुपयांच्या व्यावसायिक इमारती तसेच त्यांचे पती निखिल यांची ३ निवासी घरं आहेत, ज्यांची किंमत २ कोटी २९ लाख ८३ हजार रुपये इतकी आहे. (@Rakshatai khadse/FB) हेही पहा- कोस्टल रोड: नरीमन पॉईंट ते हाजीअली पर्यंतचा बोगदा प्रवाशांच्या सेवेत खुला; मुख्यमंत्र…

Nilesh Chavan Arrested: अखेर निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक