-
राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचा काल १० जून रोजी २५ वा वर्धापन दिन होता.
-
शरद पवार गट आणि अजित पवार गट अशी फुट पडल्यानंतर पहिल्यांदाच आलेला हा वर्धापनदिन दोन्ही गटांनी साजरा केला.
-
अजित पवार गटाने या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये कार्यक्रम आयोजित केला होता.
-
या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागेलेले होते.
-
दरम्यान या कार्यक्रमात भाषण करताना शरद पवारांच्या नावाचा उल्लेख करताना, अजित पवार भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
-
यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही कार्यकर्त्यांना उद्देशून भाषण केले.
-
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार्यकर्त्यांना वर्धापनदिन मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याच्या सूचना केल्या होत्या. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आलेला हा पहिलाच वर्धापनदिन होता.
-
या कार्यक्रमाला पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ आदी उपस्थित होते.
-
मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांनीही या कार्यक्रमास हजेरी लावली होती.
-
(All photos- Express Photo By Ganesh Shirsekar) हेही पहा- PHOTOS : जेपी नड्डा, शिवराज सिंह चौहान, एस. जयशंकर; पंंतप्रधान मोदींच्या ‘या’ कॅबिनेट…

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”