-
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईतल्या आझाद मैदान या ठिकाणी दिमाखादार सोहळ्यात शपथ घेतली. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह विविध राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंचावर उपस्थित झाल्यानंतर ५ वाजून ३१ मिनिटांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली.
-
दरम्यान राज्याला लाभलेल्या आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांबद्दल जाणून घेऊयात.
-
Maharashtra CM Names and Tenures: १. यशवंतराव चव्हाण
कार्यकाळ – १ मे १९६० ते १९ नोव्हेंबर १९६२
पार्टी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस -
२. मारोतराव कन्नमवार
कार्यकाळ – २० नोव्हेंबर १९६२ ते २४ नोव्हेंबर १९६३
पार्टी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस -
३. वसंतराव नाईक
कार्यकाळ – ५ डिसेंबर १९६३ ते २० फेब्रुवारी १९७५
पार्टी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस -
४. शंकरराव चव्हाण
कार्यकाळ – २१ फेब्रुवारी १९७५ ते १७ मे १९७७
पार्टी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस -
५. वसंतदादा पाटील
कार्यकाळ – १७ मे १९७७ ते १८ जुलै १९७८
पार्टी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस -
६. शरद पवार
कार्यकाळ – १८ जुलै १९७८ ते १७ फेब्रुवारी १९८०
पार्टी – पुरोगामी लोकशाही दल -
७. अब्दुल रहमान अंतुले
कार्यकाळ – ९ जून १९८० ते १२ जानेवारी १९८२
पार्टी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस -
८. बाबासाहेब भोसले
कार्यकाळ – २१ जानेवारी १९८२ ते १ फेब्रुवारी १९८३
पार्टी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस -
९. वसंतदादा पाटील
कार्यकाळ – २ फेब्रुवारी १९८३ ते १ जून १९८५
पार्टी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस -
१०. शिवाजीराव पाटील
कार्यकाळ – ३ जून १९८५ ते ६ मार्च १९८६
पार्टी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस -
११. शंकरराव चव्हाण
कार्यकाळ – १२ मार्च १९८६ ते २५ जून १९८८
पार्टी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस -
१२. शरद पवार
कार्यकाळ – २६ जून १९८८ तै २५ जून १९९१
पार्टी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस -
१३. सुधाकरराव नाईक
कार्यकाळ – २५ जून १९९१ ते २२ फेब्रुवारी १९९३
पार्टी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस -
१४. शरद पवार
कार्यकाळ – ६ मार्च १९९३ ते १४ मार्च १९९५
पार्टी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस -
१५. मनोहर जोशी
कार्यकाळ – १४ मार्च १९९५ ते ३१ जानेवारी १९९९
पार्टी – शिवसेना -
१६. नारायण राणे
कार्यकाळ – १ फेब्रुवारी १९९९ ते १७ ऑक्टोबर १९९९
पार्टी – शिवसेना -
१७. विलासराव देशमुख
कार्यकाळ – १८ ऑक्टोबर १९९९ ते १६ जानेवारी २००३
पार्टी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस -
१८. सुशीलकुमार शिंदे
कार्यकाळ – १८ जानेवारी २००३ ते ३० ऑक्टोबर २००४
पार्टी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस -
१९. विलासराव देशमुख
कार्यकाळ – १ नोव्हेंबर २००४ ते ५ डिसेंबर २००८
पार्टी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस -
२०. अशोक चव्हाण
कार्यकाळ – ५ डिसेंबर २००८ ते ९ नोव्हेंबर २०१०
पार्टी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस -
२१. पृथ्वीराज चव्हाण
कार्यकाळ – १० नोव्हेंबर २०१० ते २६ सप्टेंबर २०१४
पार्टी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस -
२२. देवेंद्र फडणवीस
कार्यकाळ – ३१ ऑक्टोबर २०१४ ते ८ नोव्हेंबर २०१९
पार्टी – भारतीय जनता पार्टी -
२३. देवेंद्र फडणवीस
कार्यकाळ – २३ नोव्हेंबर २०१९ ते २८ नोव्हेंबर २०१९
पार्टी – भारतीय जनता पार्टी -
२४. उद्धव ठाकरे
कार्यकाळ – २८ नोव्हेंबर २०१९ ते २९ जून २०२२
पार्टी – शिवसेना -
२५. एकनाथ शिंदे
कार्यकाळ – ३० जून २०२२
पार्टी – शिवसेना -
२६. देवेंद्र फडणवीस
कार्यकाळ – ५ डिसेंबर २०२४
पार्टी – भाजपा

“देवा असा अपघात नको रे” भरधाव कारने आईला फुटबॉलसारखे उडवले, लेकराचा आक्रोश, VIDEO पाहून तुमचाही थरकाप उडेल