-
HSC Results 2025: आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. आज बारावीचे विद्यार्थी आणि पालक निकालाकडे डोळे लावून बसले होते.
-
दुपारी एक वाजता ऑनलाइन पद्धतीने हा निकाल जाहीर झाला आहे.
-
मुलींनीच मारली बाजी
दरम्यान, यंदाच्या परिक्षेतही मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल ९४.५८ टक्के इतका लागला आहे. तर मुलांचा निकाल ८९.५ टक्के इतका लागला आहे. मागील वर्षीही मुलीच आघाडीवर होत्या. मागच्या वर्षी ९५.९४ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या होत्या. -
बारावीचा विभागनिहाय निकाल
कोकण : ९६.७४ टक्के
पुणे : ९१.३२ टक्के
कोल्हापूर : ९३.६४ टक्के
अमरावती : ९१.४३ टक्के -
छत्रपती संभाजीनगर: ९२. २४ टक्के
नाशिक : ९१.३१ टक्के
लातूर : ८९.४६ टक्के
नागपूर : ९०.५२ टक्के
मुंबई : ९२.९३ टक्के -
निकाल घसरला
दरम्यान, मागील वर्षीपेक्षा यंदाचा निकाल हा १.९४ टक्क्यांनी घसरला आहे. सर्वाधिक निकाल हा कोकण विभागाचा लागला असून ९६.७४ टक्के इतका आहे. तर लातूरचा निकाल सर्वाधिक कमी म्हणजे ८९.४६ टक्के इतका आहे. -
एकालाही नाही १०० टक्के गुण
महाराष्ट्र बारावीच्या बारावीच्या निकालात एकाही विद्यार्थ्याला १०० टक्के गुण मिळालेले नाहीत, तर तब्बल ४,५०० विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. -
१,९२९ महाविद्यालयांतील १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेत एकूण १०,४९६ महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी १,९२९ महाविद्यालयांतील १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. -
राज्यात ३८ महाविद्यालयांतील एकही विद्यार्थी उत्तीर्ण नाही
महाराष्ट्र बोर्डाने आज जाहीर केलेल्या बारावीच्या निकालात राज्यातील एकूण १०,४९६ महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. यापैकी ३८ महाविद्यालयांतील एकही विद्यार्थी उत्तीर्ण झाला नाही.

Maharashtra HSC 12th Result Live Updates: बारावीच्या परीक्षेत सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांना ७५ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण