-
Asia’s 50 Best Bars 2025 : २०२५ च्या आशियातील ५० सर्वोत्तम बारच्या यादीत पाच भारतीय बारनीदेखील स्थान मिळवले आहे. नवी दिल्लीतील Lair ने या यादीत ८ व्या क्रमांक मिळवला असून याबरोबरच तो देशातील सर्वोत्तम बार ठरला आहे. ही घोषणा मकाऊमध्ये करण्यात आली. या वर्षीच्या यादीची १४ प्रदेशांमधील ३०० हून अधिक अनामिक मतदारांनी निवड केली होती. या यादीत स्थान मिळालेल्या इतर बारमध्ये बेंगळुरूमधील तीन आणि गोव्यातील एक बार समाविष्ट आहे. हाँगकाँगच्या बार लिओन या जगप्रसिद्ध बारला प्रथम क्रमांक मिळाला आहे.
-
नवी दिल्लीतील Lairला यादीत आठवा क्रमांक मिळाला आहे आणि भारतीय बारच्या बाबतीत त्याने सर्वोच्च क्रमांक मिळवला आहे आणि यादीत हा बार एक नवीन एन्ट्री होता. जयराज सिंग सोलंकी आणि ध्रुव राज विज यांनी हा बार लाँच केला आहे. (छायाचित्र स्रोत: Instagram/@Lair)
-
बेंगळुरूच्या सोकाची २८ व्या क्रमांकासाठी निवड झाली आहे आणि या बारने देखील या यादीत पहिल्यांदाच प्रवेश केला आहे. हा बार शहरातील स्ट्रीट कल्चर साजरा करण्यासाठी ओळखला जातो. येथील कॉकटेल स्थानिक घटकांचा वापर करून बनवले जातात. फोटो स्रोत: Instagram/@Soka)
-
गोव्यातील बॉयलरमेकर (Boilermaker) हा यादीत ३० व्या क्रमांकावर आहे आणि पंकज बालचंद्रन आणि नकुल भोसले सारख्या या इंडस्ट्रीतील दिग्गजांनी हा बार सुरू केला आहे. हा बार त्याच्या फ्लेवर्ड ड्रिंक्स आणि समुद्रकिनाऱ्यावरील वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. (छायाचित्र स्रोत: Instagram/@BOILMAKER)
-
बेंगळुरू येथील ZLB23 ला 31 वा क्रमांक मिळाला आहे आणि हा बार द लीला पॅलेसमध्ये आहे. या बारमध्ये जपानी कॉकटेल्स आणि jazz मिळते. गेल्या वर्षी पदार्पण केल्यानंतर त्याने या खास यादीत पुन्हा एकदा स्थान मिळवले आहे. (छायाचित्र स्रोत: Instagram/@ZLB23)
-
बेंगळुरू येथील बार स्पिरिट फॉरवर्डला ३७ वा क्रमांक मिळाला आहे. या बारने यादीत नव्याने एन्ट्री केली आहे आणि हा बार त्याच्या कॉकटेल्ससाठी प्रसिद्ध आहे. (छायाचित्र स्रोत: Instagram/@BarSpiritForward)

Air India Plane Crash: एअर इंडिया विमानाच्या अपघातामागे पायलटचा हात? अमेरिकी वृत्तपत्राचा दाव्यावर AAIB म्हणाले…