-
Donald Trump US Tariff on EU : भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दंड म्हणून बुधवारी (६ जुलै) भारतावर २५ टक्के अतिरिक्त आयात शुल्क (टॅरिफ) लादलं. (PC : White House)
-
अमेरिकेने आधी जाहीर केलेले २५ टक्के शुल्क लागू होण्यास १४ तास बाकी असताना, ट्रम्प यांनी हा नवा आदेश जाहीर केला आहे. (AP Photo)
-
ट्रम्प यांनी घोषणा केलेल्या अतिरिक्त २५ टक्के आयात शुल्काची २१ दिवसांनी अंमलबजावणी केली जाणआर आहे. (PC : AI Generated Image)
-
दरम्यान, भारतानेही पाश्चात्य देश रशियातून करत असलेल्या आयातीवरून प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यावर ट्रम्प यांनी मौन बाळगलं आहे. (PC : Reuters)
-
अमेरिका रशियाकडून खतं व रसायने आयात करत असल्याचा मुद्दा भारताने उपस्थित केला होता. त्यावरही अमेरिकेने कोणतीही अधिकृत टिप्पणी केलेली नाही. (PC : White House)
-
अमेरिका रशियाकडून करत असलेल्या आयातीबद्दल मला काहीच माहिती नाही, मी तपास करून यावर बोलतो, असं ट्रम्प दोन दिवसांपूर्वी म्हणालो होते. (PC : AP)
-
भारत आता जागतिक स्तरावर सर्वाधिक अमेरिकन टॅरिफचा सामना करत आहे. भारताबरोबर ब्राझीलवरही अमेरिकेने ५० टक्के आयात शुल्क लागू करत असल्याची घोषणा केली आहे. वरच्या श्रेणीतील काही देशांवर अमेरिकेने भारतापेक्षा कमी आयात शुल्क लावलं आहे. स्वित्झर्लंड वर ३९ टक्के, कॅनडा व इराकवर ३५ टक्के आणि चीनवर केवळ ३० टक्के आयात शुल्क लावलं आहे. (PC : AI Generated Image)
-
अमेरिका ही भारताची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. २०२४ मध्ये अमेरिकेने भारताकडून ८७ अब्ज डॉलर्स किंमतीच्या वस्तू खरेदी केल्या. याच काळात भारताने अमेरिकेकडून ४१ अब्ज डॉलर्सच्या वस्तू आयात केल्या आहेत. (PC : Narendra Modi/X)
-
रशियाकडून निषेध
या सगळ्यात मॉस्कोने भारताची बाजू घेतली आहे. वॉशिंग्टनच्या कर आकारणीचा रशियाने निषेध नोंदवला आहे. (PC : Narendra Modi/X) -
क्रेमलिनने म्हटलं आहे की सार्वभौम देशांना त्यांचे स्वतःचे व्यापारी भागीदार निवडण्याचा अधिकार आहे.(PC : Narendra Modi/X)

VIDEO: कबूतरखाना बंद झाला पण हे पक्ष्यांना कसं सांगणार? दादरमध्ये कबुतरखान्याजवळ प्रचंड संख्येनं येत कबुतरांनी काय केलं पाहा