-
शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकरणातले जुने जाणते नेते आहेत. त्यांची महाराष्ट्राच्या राजकारणावर पकड आहे. (शरद पवारांचे सर्व फोटो, सौजन्य-शरद पवार फेसबुक पेद)
-
शरद पवार यांनी मंडल मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली आहे. दरम्यान लक्ष्मण हाके यांनी शरद पवारांवर बोचरी टीका केली आहे.
-
लक्ष्मण हाके म्हणाले, मनोज जरांगे नावाच्या बबड्याला रसद पुरवणारे त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणारे, भेट देणारे शरद पवार आज ओबीसींच्या बाजूने मंडल यात्रा काढत आहेत, साताऱ्यात त्यांनी हे विधान केलं आहे.
-
ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर सरकारला धारेवर धरणारे लक्ष्मण हाके यांनी खासदार शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. शरद पवार हे इच्छाधारी नागाप्रमाणे वेटोळे घालून बसले आहेत, अशी बोचरी टीका हाके यांनी केली आहे.
-
शरद पवारांची ओळखच दगाबाज नेता ही आहे. सांगायचे एक आणि करायचं एक असे शरद पवार आहेत असंही हाके म्हणाले.
-
ओबीसींमध्ये फुट कशी पाडायची, फोडा आणि जोडा हे शरद पवार यांचे राजकारण आहे असंही लक्ष्मण हाके म्हणाले.(लक्ष्मण हाके यांचे सर्व फोटो सौजन्य-लक्ष्मण हाके फेसबुक पेज)
-
शरद पवार ईस्ट इंडिया कंपनीप्रमाणे वागतात. महाराष्ट्रातील ओबीसी आणि भटक्या विमुक्त जातींचं अंतकरण समजून घ्यायला हवं होतं असंही लक्ष्मण हाके म्हणाले.
-
शरद पवार ओबीसींच्या बाजूने गळा काढतात त्यावेळी ते ओबीसींच्या विरोधामध्ये षडयंत्र रचत असतात, असाही आरोप त्यांच्यावर लक्ष्मण हाकेंनी केला आहे.
Supreme Court Order: भटक्या कुत्र्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्देश; सर्व राज्यांना निर्णय लागू!