-
सध्या राज्यातील प्रसिद्ध मंदिरांमध्ये भाविकांसाठी ड्रेसकोड लावला जात आहे. गेल्या काही दिवसांत असे निर्णय घेण्याचा विचार अनेक मंदिर प्रशासनामार्फत जाहीर केला जात आहे.
-
आता कोकणातील प्रसिद्ध व निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या गणपतीपुळे मंदिरानंही भाविकांना ड्रेसकोड लागू केला आहे.
-
त्यामुळं आता गणरायाच्या भक्तांना मंदिरात जायचे असेल तर ड्रेसकोड नियम पाळावा लागणार आहे. तसं आवाहन मंदिर प्रशासनाने केलं आहे.
-
दरम्यान, मंदिराच्या प्रवेशद्वारावर मंदिर प्रशासनाने वेशभूषेसंबंधी माहिती सांगणारा बोर्ड लावला आहे.
-
ड्रेसकोडचं आवाहन काय?
कमी कपड्यात. ट्रीप लूकच्या कपड्यात. समुद्रावर जाण्यासाठी केलेल्या पेहरावात. मंदिरात प्रवेश मिळणार नाही असं आवाहन मंदिर प्रशासनाने केलं आहे. -
गुडघ्यांच्यावर येणारे स्कर्ट्स, ड्रेस परिधान करू नयेत, असं आवाहन महिलांसाठी करण्यात आलंय. तसंच असभ्य भाषा, आक्षेपार्ह चित्र असलेले कपडे टाळावे असेही वेशभूषा नियमावलीत नमूद करण्यात आले आहे. तर यामध्ये १० वर्षांच्या आतील मुलांना सूट आहे.
-
दरम्याम, यंदा वर्षाच्या सुरुवातीला मुंबईतल्या श्री सिद्धिविनायक मंदिरानेही ड्रेसकोड लागू केला आहे.
-
इतर मंदिरं
सिंधुदुर्ग किल्ल्यातील शिवराजेश्वर मंदिरात प्रवेशासाठी ड्रेसकोड लागू आहे. लोणावळ्यातील आई एकविराच्या मंदिरात भाविकांना ड्रेस कोड आहे. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात वस्त्रसंहिता लागू आहे. -
(सर्व फोटो साभार- सोशल मीडिया) हेही पाहा- सरफरोश, लगान ते क्रांती; स्वातंत्र्यदिनी पाहा ‘हे’ १२ ब्लॉकबस्टर देशभक्तीपर चित्रपट….

पोटातली सगळी घाण एका दिवसात बाहेर पडेल; खराब कोलेस्ट्रॉलही नसांमध्ये चिकटणार नाही, आठवड्यातून एकदा फक्त “ही” ४ फळ खा