-
ऑगस्ट २०२५ मध्ये उत्तर भारत आणि पाकिस्तानला भयानक पूरपरिस्थितीचा सामना करावा लागत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन झाले, संपूर्ण गावे वाहून गेली आणि शेकडो लोक मृत्युमुखी पडले. लहान भागात अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान आणि मानवी जीवितहानी सहन करावी लागत आहे. यात एकूण २८० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे, तर शेकडो लोक ‘बेपत्ता’ असल्याची नोंद आहे. (Photo Source: Associated Press)
-
मुसळधार पावसामुळे नद्यांचे काठ ओसंडून वाहत आहेत. घरे आणि शेतात पाणी शिरले आहे. बहुतेक मृत्यू पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा प्रांतात झाले आहेत, जिथे मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये अचानक पूर आला. (Photo Source: Associated Press)
-
जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील चिसोटी गावात ढगफुटीमुळे आलेल्या अचानक आलेल्या पुरानंतर भारतीय सशस्त्र दलांनी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) सोबत बचाव कार्य सुरू केले. (Photo Source: PTI)
-
शुक्रवारी जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात ढगफुटीमुळे आलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानाची माहिती देण्यासाठी भारतातील आपत्तीग्रस्त चिसोटी गावातील लोक रस्त्यावर जमले. (Photo Source: PTI)
-
पाकिस्तानमधील मुझफ्फराबादजवळील नारयान बेहक गावात ढगफुटीमुळे अचानक पूर आल्याच्या घटनेच्या ठिकाणी गावकरी नुकसान झालेल्या घरांच्या ढिगाऱ्यांमधून लाकूड आणि इतर उपयुक्त वस्तू गोळा करताना. (Photo Source: Associated Press)
-
पाकिस्तानच्या वायव्येकडील स्वात खोऱ्यातील मुख्य शहर असलेल्या मिंगोराच्या परिसरात मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे विद्युत खांबाला अडकलेल्या नुकसानग्रस्त गाड्यांजवळून रहिवासी चालत जात आहेत. (Photo Source: Associated Press)
-
अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हेलिकॉप्टर, बोटी आणि आपत्कालीन पथकांनी भीषण परिस्थिती आणि धोकादायक प्रवाहांचा सामना केला. पाकिस्तानमध्ये आज हवामानाच्या तीव्र परिस्थितीमुळे मदत साहित्य घेऊन जाणारे एक बचाव हेलिकॉप्टर कोसळले, ज्यामध्ये ५ क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला. (Photo Source: Associated Press)
-
पुरामुळे पायाभूत सुविधांचेही मोठे नुकसान झाले, अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या आणि प्रमुख रस्ते बंद पडून वाहतूक विस्कळीत झाली, ज्यामध्ये पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये असलेल्या गिलगिट-बाल्टिस्तानमधील काराकोरम महामार्ग आणि बाल्टिस्तान महामार्ग यांचा समावेश आहे. (Photo Source: Associated Press)

तब्बल ३० वर्षांनंतर कर्मदाता शनिदेव ‘या’ ३ राशींना बनवणार करोडपती! प्रचंड श्रीमंती अन् आयुष्यात येणार भरभरुन सुख