-
भारतीय हवामान विभागाने आज मंगळवार, दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात (मुंबई शहर आणि उपनगरे) अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कालपासून मुंबईत सातत्याने पाऊस कोसळतो आहे. (Photo:PTI)
-
या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता, इतर सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यालये यांना महानगरपालिकेकडून आज सुटी जाहीर करण्यात आली आहे. (Photo:PTI)
-
याचबरोबर मुंबई महानगरातील सर्व खासगी कार्यालये, आस्थापना यांनी आपल्या कामकाजाच्या स्वरूपानुसार, कर्मचाऱ्यांना घरी राहून कामकाज करण्याच्या आणि अनावश्यक प्रवास टाळण्याच्या सूचना देण्याचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे आवाहन करण्यात आले आहे. (Photo:PTI)
-
कालपासून सातत्याने कोसळत असलेल्या पावसामुळे मुंबईतील अनेक भागांत पाणी साचल्याचे दृश्य आहे. दादर हिंदमाता परिसराला याचा मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे.(Photo:PTI)
-
पावसामुळे महापालिका प्रशासनाने शहरातील सर्व शांळांना सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. याचबरोबर मुंबई विद्यापीठाच्या परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. (Photo:PTI)
-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट देत मुंबई शहर आणि परिसर तसेच राज्यातील इतर भागात मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती घेतली आणि आवश्यक त्या सूचना केल्या आहेत. (Photo:DGIPR)
-
मिठी नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे स्थलांतर करण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. (Photo:DGIPR)
-
पावसामुळे नालासोपाऱ्यातील काही घरांमध्ये पाणी शिरल्याचे पाहायला मिळत असून, यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. (Photo: ANI)