-
भारताचा शेजारी देश नेपाळमधील राजकीय स्थिती कमालीची तणावपूर्ण झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून नेपाळमधील Gen Z आणि मोठ्या संख्येने तरुणाई रस्त्यांवर उतरून नेपाळ सरकारविरोधात आंदोलन करताना दिसत आहे. (सर्व फोटो-ANI)
-
सोशल मीडिया साईट्सवर बंदी घातल्याचा निषेध या तरुणाईनं केला. त्यावर १९ तासांनी ही बंदी सरकारला उठवावी लागली. मात्र, त्यानंतरदेखील रस्त्यावर उतरलेल्या तरुणाईचा असंतोष कमी झाला नाही.
-
नेपाळ सरकारमधील भ्रष्टाचाराच्या विरोधात जनता रस्त्यावर उतरून आंदोलन करत असताना त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात होता. मात्र, आंदोलन हिंसक होत असल्याचं पाहून पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.
-
नेपाळमध्ये संतप्त झालेल्या आंदोलकांनी आज पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानाला आग लावून ते पेटवून दिलं. पंतप्रधानांबरोबरच सत्ताधारी गटातील इतरही काही महत्त्वाच्या नेत्यांच्या घरांना अशाच प्रकारे आग लावण्यात आली.
-
सोमवारी आंदोलक व पोलीस प्रशासन यांच्यात झालेल्या धुमश्चक्रीमध्ये १९ आंदोलकांचा मृत्यू झाला. त्याचे तीव्र पडसाद आंदोलकांमध्ये उमटले. परिणामी मंगळवारी सकाळपासूनच कर्फ्यू असूनही आंदोलक आक्रमकपणे निदर्शने करत सरकारी मालमत्तांवर हल्ले करताना दिसून आले.
-
गेल्या काही दिवसांपासून नेपाळमध्ये सरकारी यंत्रणांमधील भ्रष्टाचाराविरोधात वातावरण तापू लागलं होतं. विरोधकांनीदेखील सरकारच्या भ्रष्टाचारावर तीव्र शब्दांत टीका केली होती. त्याअनुषंगाने नेपाळी जनतेमधूनही या प्रकारांना विरोध केला जाऊ लागला
-
सोमवारी नेपाळ सरकारने फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, यूट्यूब, एक्स अशा सोशल मीडिया साईट्सवर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे संतप्त झालेले तरुण रस्त्यावर उतरले.
-
Gen Z वयोगटातील नवतरुणांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता. पहिल्यांदाच नेपाळमधील Gen Z अशा प्रकारे उत्स्फूर्तपणे एखाद्या आंदोलनात सहभागी झाले होते
-
नेपाळमध्ये ठिकठिकाणी या तरुणांनी सरकारी धोरणांविरोधात निदर्शने करायला सुरुवात केली. “बंदी भ्रष्टाचारावर आणा, समाजमाध्यमांवर नाही” अशा घोषणा दिल्या आणि हे आंदोलन पेटलं.

Apple Event 2025 Live Updates: दमदार फिचर्ससह आयफोन 17 एयर लाँच, आजवरचा सर्वात स्लिम आयफोन