-
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतची माहिती वाचायला अनेकांना आवडतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच दिनक्रम सांगितला आहे. तसंच संघाच्या संस्कारांवरही भाष्य केलं आहे. (सर्व फोटो सौजन्य-देवेंद्र फडणवीस फेसबुक पेज)
-
देवेंद्र फडणवीस म्हणाले माझ्यासाठी कुठलाही दिवस नॉर्मल किंवा साधा असा नसतो. मी सकाळी ६ वाजता उठत नाही. मी आठ वाजता उठतो. झोपायला मला पहाटेचे तीन वाजतात.
-
देवेंद्र फडणवीस म्हणाले रोज आठ वाजता सकाळ झाल्यानंतर माझ्या नित्य कार्यांना साधारण दीड तास लागतो. त्यानंतर लोकांच्या भेटीगाठी सुरु होतात.
-
देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की मोठ्या प्रमाणावर मी फिरत असतो. माझं ट्वीटर हँडल, सोशल मीडिया हँडल्स पाहिलीत तर तुम्हाला कळेल की मी प्रवास सतत करत असतो.
-
संपूर्ण आठवड्यात असा एकही दिवस नसतो जेव्हा मी काम करत नाही. शनिवार, रविवार सगळ्या दिवशी मी काम करतो. माझ्याकडे रोज ५० फाईल्स किमान येतात. त्या मी बाकी ठेवत नाही. धोरणात्मक फाईल्स मागे असतात.
-
देवेंद्र फडणवीस म्हणाले की रोज पाच तासांची झोप मला आवश्यक वाटते. पण अनेकदा ती चार तासच मिळते. तसं झालं की जाणवतं की झोप आज पूर्ण झालेली नाही.
-
देवेंद्र फडणवीस म्हणाले की माझी दिवसाची सुरुवात ब्लॅक कॉफीने होत होती. पण नंतर मग चार कप तरी कॉफी व्हायची त्यामुळे आता ग्रीन टी ने मी माझा दिवस सुरु करतो.
-
देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी १० ते १५ मिनिटं पूजा करतो, काही पाठ असतात, स्तोत्रं असतात ते मी नित्यनेमाने करतो. त्याशिवाय मी घर सोडत नाही. -
मी क्रिमिनल जस्टिस ही वेब सीरिज बिंज वॉच केली. मला पंकज त्रिपाठींचं काम आवडतं. मी त्यांच्या क्रिमिनल जस्टिसचा चौथा सिझन पाहिला आणि त्यानंतर मी बाकीचे तिन्ही सिझनही पाहिले. पंकज त्रिपाठी यांची भूमिका खूप छान आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
-
१९७५ मध्ये आणीबाणी लागली होती, त्यावेळी संघावर बंदी घालण्यात आली. १९७७ मध्ये आणीबाणी हटवण्यात आली आणि संघावरची बंदीही हटवण्यात आली. मी सात वर्षांचा होतो तेव्हा माझ्या घरासमोरच शाखा भरायची, मी वयाच्या सातव्या वर्षापासून शाखेत जातो असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
-
संघाच्या शाखेत छत्रपती शिवाजी महाराज शिकायला मिळाले. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी सांगितल्या जातात. रामायण, महाभारत यामधल्या गोष्टी सांगितल्या जातात. राष्ट्रवादाची प्रेरणा मला संघातून मिळाली आहे असंही फडणवीस म्हणाले.
-
संघाच्या शाखेत मी मारुती स्त्रोत्रं शिकलो, अनेक स्तोत्रंही शिकलो.तसंच संघाच्या शाखेत व्यक्तीवर संस्कार होतात, राष्ट्रवाद संघात शिकवला जातो.
-
मी लहानपणापासून संघात जातो, जात व्यवस्था कधीही संघात शिकवली जात नाही. समरसता, एकता यांचे भाव हे आम्हाला संघाच्या शाखेतच शिकायला मिळाले असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी हे भाष्य केलं.
-
जीवन मूल्यं शिकण्याचं आणि त्यांच्यासह आयुष्यात पुढे चालणं हे आम्हाला संघाने शिकवलं आहे असं देवेंद्र फडणवीस या मुलाखतीत म्हणाले.
-
मी पदावर असलो काय किंवा नसलो काय? माझ्या व्यवहारात काही अंतर येत नाही, याचं कारण संघ आहे. कारण संघाने हे शिकवलं आहे की पद मिळणं ही जबाबदारी आहे. तो काही अलंकार नाही. -
कुठल्याही पदावर गेल्यानंतर आमच्या मनात हा भाव असतो की आपण मोठे झालेलो नाही आपल्याला मोठी जबाबदारी मिळाली आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
-
माझ्या राजकीय आयुष्यात मी विरोधी पक्षात १५ वर्षे होतो, त्यानंतर मुख्यमंत्री होतो. त्यानंतर मला विरोधी पक्षनेतेपद मिळालं मी तसं काम सुरु केलं. त्यानंतर मी उपमुख्यमंत्री झालो. आता मुख्यमंत्री झालो आहे त्यामुळे तसं काम सुरु आहे. -
जी भूमिका आपल्याला मिळते त्या भूमिकेत तुम्ही पूर्ण ताकदीने काम करा असं मला कायमच वाटतं असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

“नाना पाटेकरांची भयंकर बाजू मी पाहिली आहे, ते नकोसे वाटतात”; दिग्गज अभिनेत्रीचं विधान