-
Thalapathy Vijay Net Worth 2025: अभिनय क्षेत्रातून आता राजकारणात प्रवेश केलेला तमिळ अभिनेता थलपथी विजय याच्या शनिवारी संध्याकाळी करूर येथे झालेल्या सभेत चेंगराचेंगरी झाली असून यामध्ये किमान ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १०० हून अधिक जखमी झाले आहेत.
-
२२ जून १९७४ रोजी तामिळनाडूच्या चेन्नई येथे जन्मलेल्या जोसेफ विजय चंद्रशेखर यांनी त्यांचे वडील डायरेक्टर एस. ए. चंद्रशेखर यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रपट क्षेत्रात पदार्पन केले. (फोटो – Insta/@actorvijay)
-
सध्या तमिलगा वेत्री कळघम (टीव्हीके) पक्षाचा अध्यक्ष थलापती विजय याने ३० वर्षांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत लक्षणीय संपत्ती जमवली आहे. (फोटो – Insta/@actorvijay)
-
थालापती विजयची नेट वर्थ किती?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, २०२४ पर्यंत थलापती विजयची अदाजे एकूण संपत्ती ६०० कोटी रुपये होती. तो त्याच्या प्रत्येक चित्रपटासाठी १०० ते १२० कोटी रुपये घेतो आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून सुमारे वर्षाला १० कोटी रुपये कमावतो. (फोटो – Insta/@actorvijay) -
विजय हा चित्रपटासाठी सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्यांचा चित्रपट आणि समाजिक क्षेत्र आशा दोन्ही ठिकाणी प्रचंड प्रभाव पाहायला मिळतो. (फोटो – Insta/@actorvijay)
-
विजयची ब्रँड अपील वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये पाहायला मिळते, ज्यामध्ये रियल इस्टेट, एंडोर्समेंट्स, आणि प्रॉडक्शन कोलॅब्रेशन्स यांचा समावेश आहे. त्याच्या लोकप्रियतेमुळे त्याला सातत्याने हाय-व्हॅल्यु डिल्स मिळतात, ज्यामुळे त्यांच्या संपत्तीत मोठी भर पडत राहते. (फोटो – Insta/@actorvijay)
-
अभिनेता विजयचे चेन्नईमधील नीलंकराई येथील कॅसुआरिना ड्राइव्ह वर एक आलिशान सी-साइड बंगला आहे. हा बंगला हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूझच्या बीच हाऊसपासून प्रेरित आहे.

लोकप्रिय मराठमोळी गायिका लवकरच होणार आई! लग्नानंतर तीन वर्षांनी दिली खुशखबर; शेअर केली खास पोस्ट