-
दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मोठ्या संख्येने जमलेल्या शिवसैनिकांना संबोधित करताना एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे याच्यांवर जोरदार टीका केली.
-
यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, “मी वर्क फ्रॉम होम आणि फेसबुक लाईव्ह करणारा शिवसैनिक नाही. मी ग्राउंडवर उतरून काम करणारा शिवसैनिक आहे, आम्हाला बाळासाहेबांनी हेच शिकवले आहे.”
-
तुम्ही बिस्किटाचा पुडा तर दिला का? मी पाहणी करायला जाण्यापूर्वीच तिथे मदतीचे ट्रक गेले होते. पूरग्रस्तांच्या मदतीवरून एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका
-
लाडकी बहीण योजना, एक रुपयात पीक योजना तसेच मुंबईतील टोलबंदी यासारखे निर्णय आम्ही घेतले आहे. आम्ही आतापर्यंत देण्याचे काम केले आहे. मी मुख्यमंत्री असताना साडेचारशे कोटींचा निधी दिला. तुम्ही काय केले? असा प्रश्न शिंदे यांनी ठाकरे यांना केला.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन्ही हातांनी महाराष्ट्राला देत आहेत, तरी त्यांच्यावर तुम्ही टीका करत आहात. पाकड्यांनी पहलगामध्ये हल्ला केला त्याला पतंप्रधानांनी इट का जवाब पत्थर से आणि गोली का जबाब गोली से दिला.
-
सावरकरांवर राहुल गांधी मुद्दाम टीका करतात तरी तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसता. जर बाळासाहेब असते तर उलटे टांगून मिर्चीची धूरी दिली असते.
-
कोणीही आला तरी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ शकत नाही. मुंबई महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची आहे आणि मराठी माणसाचीच राहणार आहे.
-
लोकसभा आपण जिंकली, विधानसभा जिंकली आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही आपल्याला विजय मिळवायचा आहे, असे आवाहन एकनाथ शिंदेंनी दसऱ्या मेळाव्यात केले.
-
पक्षाचा प्रमुख, पक्षातील लोक संपवण्यासाठी कधी प्रयत्न करतो का? हे पक्षप्रमुख नाहीत तर हे ‘कट’प्रमुख आहेत. एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका
-
बाळासाहेबांचे राम मंदीर बांधण्याचे आणि ३७० कलम हटवण्याचे स्वप्न पंतप्रधान मोदींनी पूर्ण केले आणि त्यांच्यावरच तुम्ही टीका करत आहात. हा एकनाथ शिंदे बाळासाहेबांची स्वप्ने पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आरएसएसवरही तुम्ही टीका करता. जेव्हा जेव्हा संकटे येतात, तेव्हा ते धावून जातात.
-
तुम्ही लाडकी बहीण योजना बंद होणार म्हणून खोटे परवता. पण मी सांगतो की, ही योजना कधीही बंद होणार नाही.

अभिनेत्री लग्नानंतर सात वर्षांनी झाली आई, जुळ्या मुलींना दिला जन्म; लेकी २ महिन्यांच्या झाल्यावर शेअर केली पोस्ट