-
जाहिरात जगताने आपल्या सर्वात प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्वांपैकी एक, पियुष पांडे – यांना गमावले आहे ज्यांना आधुनिक भारतीय जाहिरातींना आकार देण्याचे श्रेय दिले जाते. ‘कल्चरल स्टोरीटेलिंग’मध्ये सर्जनशीलतेचे मिश्रण करण्यासाठी ओळखले जाणारे, पांडे यांचा वारसा अविस्मरणीय जाहिरातींमधून जिवंत आहे जो भारताच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. (एक्सप्रेस फोटोवेब)
-
अगदी शून्यापासून सुरूवात – १९५५ मध्ये जयपूर येथे जन्मलेले पांडे १९८२ मध्ये ओगिल्वी इंडिया (Ogilvy India) मध्ये क्लायंट एक्झिक्युटिव्ह म्हणून रूजू होण्यापूर्वी राजस्थानकडून रणजी ट्रॉफी क्रिकेट खेळले. या त्यांच्या सुरुवातीच्या काळातूनच त्यांच्या जमिनीशी जोडलेल्या आणि रिलेटेबल स्टोरिटेलिंगच्या शैलीला आकार मिळाला. (एक्सप्रेस फोटोवेब)
-
जाहिराती कल्चरचा भाग बनल्या – पांडे यांनी बनवलेली फेविकॉलच्या बसच्या जाहिरातीपासून ते कॅडबरीच्या ‘कुछ खास है’ आणि व्होडाफोनच्या झूझू पर्यंत, पांडे यांच्या कामाने भारतीय जाहिरातींची व्याख्याच बदलून टाकली. त्यांच्या जाहिरातींमध्ये विनोद, साधेपणा आणि भावनांचा अचूक मेळ पाहायला मिळत असे. (विकिपीडिया कॉमन्स)
-
भारतीय जाहिरातींचा आवाज – पांडे यांनी पाश्चात्य जाहिरातींपासून दूर जाऊन भारतीय भाषा आणि भावनांना केंद्रस्थानी ठेवले. त्यांच्या दृष्टिकोनामुळे प्रत्येक ब्रँड स्टोरी ओळखीची बनली आणि ती खोलवर भारतीय वाटू लागली. (एक्सप्रेस फोटोवेब)
-
पुरस्कारांच्या पलीकडे – पद्मश्री पुरस्कार विजेते (२०१६) आणि कान्स लायन्स ज्युरी अध्यक्ष, पांडे यांना त्यांच्या कारकिर्दीत १,००० हून अधिक पुरस्कार मिळाले, ज्यात २०२४ मध्ये एलआयए लेजेंड पुरस्काराचा समावेश आहे. (एक्सप्रेस फोटोवेब)
-
जाहिरातींच्या पलीकडे: पियुष पांडे यांनी त्यांचे भाऊ प्रसून पांडे यांच्याबरोबर मिळून ‘पांडेमोनियम’ हे पुस्तक लिहिले, ज्यामध्ये त्यांच्या सर्जनशील तत्वज्ञानाची आणि भारताच्या जाहिरात उत्क्रांतीच्या प्रवासाची झलक दाखवली आहे. (एक्सप्रेस फोटोवेब)
-
कायम जिवंत राहिल असा वारसा – २०२३ मध्ये ओगिल्व्ही सोडल्यानंतरही, पांडे एक मार्गदर्शक आणि कल्चरल आयकॉन राहिले. त्यांच्या जाण्याने एका युगाचा अंत झाला, परंतु त्यांची स्टोरिटेलिंग प्रत्येक भारतीय जाहिरात निर्मात्याला प्रेरणा देत आहे. (एक्सप्रेस फोटोवेब)
बी. आर. गवई यांच्या निवृत्तीनंतर भारताचे सरन्यायधीश होणारे न्यायमूर्ती सूर्यकांत कोण आहेत?