-
विश्वचषक स्पर्धेत गेल्या दोन सामन्यांमध्ये शांत असलेले ख्रिस्तोफर गेल नावाच्या वादळाने मंगळवारी भयाण रुप धारण केलं. ‘द ग्रेट डिस्ट्रॉयर’ म्हणून ओळख असलेल्या वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेल याने झिम्बाव्बे विरुद्धच्या सामन्यात १४७ चेंडूत २१५ धावांची विस्फोटक खेळी साकारून विश्वचषक स्पर्धेत नवा विक्रम प्रस्थापित केला.
-
याआधी सचिनने कमीतकमी १४७ चेंडूत द्विशतक गाठले होते. गेलने यावेळी १६ षटकार आणि ९ चौकारांसह अवघ्या १३८ चेंडूत द्विशतक गाठले.
-
ख्रिस गेल विश्वचषक स्पर्धेत द्विशतक ठोकणारा पहिला खेळाडू ठरला असून त्याने क्रिकेटवीर सचिन तेंडुलकरचाही विक्रम मोडीस काढला.
-
गेलने जोडीदार मार्लोन सॅम्यूअल्ससोबत तब्बल ३३२ धावांची भागीदारी रचून एकदिवसीय क्रिकेटमध्ये दुसऱया विकेटसाठी सर्वोच्च भागीदारीचा विक्रम देखील रचला.
-
झिम्बाब्वेला वेस्ट इंडिजच्या केवळ एका खेळाडूला माघारी धाडता आले.
-
ख्रिस गेल विश्वचषक स्पर्धेत पहिले द्विशतक झळकावणारा खेळाडू ठरला. या द्विशतकी खेळीसह गेलने रोहित शर्माच्या १६ षटकारांच्या विक्रमाशीही बरोबरी साधली.
-
झिम्बाब्वेच्या खेळाडूंनी ख्रिस गेल या वादळाला रोखून धरण्याचा अखेरपर्यंत नेटाने प्रयत्न केला.
-
महत्त्वाचीबाब अशी की, २०१० साली याच दिवशी सचिन तेंडुलकरने ग्वालियारच्या स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरोधात १४७ चेंडूत द्विशतकी खेळी साकारुन एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिले द्विशतक ठोकण्याचा विक्रम केला होता. यावेळी ख्रिस गेल विश्वचषक स्पर्धेत पहिले द्विशतक झळकावणारा खेळाडू ठरला.
-
वेस्ट इंडिजने दिलेल्या ३७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेच्या संघाला २८९ धावांपर्यंतच मजल मारता आली.

बाई…कसली नाचली! ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर तरूणीने धरला ठेका; VIDEO पाहून कराल कौतुक