-
मुंबई उच्च न्यायालयाने शहरातील घोडागाडी आणि बग्गीवर बंदी घातल्याने ग्रँटरोडयेथील फॉकलँड मार्गावर उभ्या असलेल्या या घोडागाड्या. (छाया- अमित चक्रवर्ती)
-
घोडय़ांच्या काळजीने न्यायालयात गेलेल्या प्राणीमित्र संघटनांना दिलासा मिळाला असला तरी सुटीच्या दिवशी किनाऱ्यावरील मौजेची रपेट बंद होणार असल्याबद्दल मुंबईकरांमध्ये नाराजी आहे. (छाया- अमित चक्रवर्ती)
-
घोडय़ांची योग्य काळजी घेऊन शहराचे हे वैशिष्टय़ टिकवायला हवे, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. (छाया- अमित चक्रवर्ती)
-
घोडागाडीच्या रपेटवर बंदी घालण्यात आल्याने मुंबईतील जवळपास १३० घोडागाड्या तंबूत दाखल झाल्या आहेत. (छाया- अमित चक्रवर्ती)
-
दगदगीच्या आयुष्यात सुटीच्या दिवशी समुद्रकिनारी मारता येणारी रपेट हा तमाम मुंबईकरांसाठी आनंदाचा उच्चबिंदू. मात्र, उच्च न्यायालयाच्या निर्णयाने मुंबईकरांच्या घोडेसफरीच्या आनंदाला पूर्णविराम मिळाला आहे. (छाया- अमित चक्रवर्ती)
-
मुंबईत आजमितीला ३७४ घोडे असून १३० घोडागाडय़ा आहेत. यातील २० गाडय़ा नरिमन पॉइंट, ४० गाडय़ा गोराई, तर उर्वरित बोरिवली, जुहू, वांद्रे येथे आहेत. (छाया- अमित चक्रवर्ती)
-
घोडय़ांच्या काळजीने न्यायालयात गेलेल्या प्राणीमित्र संघटनांना दिलासा मिळाला असला तरी सुटीच्या दिवशी किनाऱ्यावरील मौजेची रपेट बंद झाल्याबद्दल मुंबईकरांमध्ये नाराजी आहे. (छाया- प्रदीप दास)
-
२०० वर्षांचा इतिहास असलेला मुंबईची घोडागाडी परंपरा या निर्णयामुळे खंडित होईल. (छाया- प्रदिप दास)
-
पनवेल येथील साडेसहा एकर जागेत या घोडय़ांना वर्षभरात सोडण्याचे निर्देश न्यायालयाने पालिकेला दिले आहेत. (छाया- प्रदिप दास)
-
घोडय़ांना ठेवण्यासाठी, त्यांची काळजी घेण्यासाठी सरकारने सर्वसमावेशक योजना आखावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. (छाया – दिलीप कागडा)
-
सरकारने सर्वसमावेशक योजना ३१ डिसेंबपर्यंत आखण्याचे स्पष्ट करत आदेशाचा पूर्तता अहवाल जानेवारी २०१६ मध्ये सादर करण्यात यावा, असे न्यायालयाने स्पष्ट केले. (छाया – दिलीप कागडा)
युती धर्माला तिलांजली! भाजपच्या प्रवेशांवरून सेना भडकली; एकनाथ शिंदे यांना संयम सोडण्याचे आर्जव…