
चेन्नई येथील पहिल्या मेट्रोचे उदघाटन झाल्यानंतर प्रवाशांनी अलंदूर मेट्रो रेल्वे स्थानकात मेट्रोने प्रवास करण्यासाठी गर्दी केली होती. (छायाः पीटीआय) 
अमरनाथ यात्रेसाठी प्रशासनाने जम्मू काश्मीरमधील बलताल येथे असलेल्या बेस कॅम्पमध्ये यात्रेकरुंना मुक्काम करण्यासाठी तंबूंची व्यवस्था केली आहे. (छायाः पीटीआय) -
२०१०च्या राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा या भारतीय जोडीने कॅनडा खुल्या बॅडमिंटन स्पध्रेत महिला दुहेरीच्या जेतेपदाला गवसणी घातली. (छायाः पीटीआय)

रेस अक्रॉस अमेरिका (रॅम) ही जगातील सर्वात कठीण सायकल शर्यत यशस्वीरित्या पूर्ण करण्यात नाशिकचे महेंद्र व हितेंद्र महाजन हे डॉक्टर बंधू यशस्वी ठरले आहेत. महाजन बंधूंनी आठ दिवस १४ तास आणि ५५ मिनिटांत ही शर्यत पूर्ण केली. (छायाः पीटीआय) 
देशाच्या निर्यात प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पिपावाव बंदर परिसरात प्रचंड पाऊस पडल्याने या परिसरातील धरणाचे दरवाजे उघडण्यात आले होते. त्यामुळे या बंदराला भावनगरसह इतर देशाशी जोडणाऱ्या रेल्वेमार्गापैकी तब्बल दीड किलोमीटरचा मार्ग वाहून गेला आहे. -
मुंबईतील पर्जन्यवृक्षांवर काही दिवसांपासून किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. या किडीचा शहरातील ३०० हून अधिक झाडांना मोठा फटका बसला आहे. या हल्ल्यात सुमारे १५० झाडे निष्पर्ण झाली आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण शहरातील ५०० वृक्षांना याची हानी पोहोचली असून त्यातील काही झाडांनाच वाचवण्यात पालिकेला यश आले आहे. (छाया : प्रदीप दास)
पैसा.. मोठी नोकरी.. फ्लॅट…२०२६ वर्ष ‘या’ ३ राशींसाठी सुवर्णयुगाची सुरुवात; ३० वर्षांनंतर शनि-बुधाच्या दुर्मीळ युतीनं नशिब पालटणार