-
बोइंगप्रमाणेच एअरबस या कंपनीनेही भारतातून विमाननिर्मिती करण्याचे ठरविले आहे. अमेरिकी बोइंगचा विमान जुळवणी व देखभाल प्रकल्प महाराष्ट्रात प्रगतिपथावर असतानाच युरोपातील एअरबसचे मुख्य कार्यकारी अधिकारी बर्नहार्ड गेवर्ट यांनीही भारतासाठी रस दाखविला आहे. गेवर्ट यांनी मंगळवारी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर याबाबत चर्चाही केली. पंतप्रधानांच्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेला प्रतिसाद म्हणूनच २ अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याचे एअरबसने निश्चित केले आहे.
-
‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ योजना राज्यातील दुष्काळी भागात अजूनही योग्यरीत्या अवलंबली जात नसली तरी मुंबईच्या रस्त्यांवरील हजारो खड्डेयुक्त तळ्यांमधून ती साकारली जात आहे. मान्सूनच्या पहिल्याच टप्प्यातील पावसात शहरातील रस्त्यांवर खड्डे पडले असून जूनअखेरीस त्यांचा आकडा १३०० वर पोहोचला.
-
नवी मुंबईतील वाशी खाडीच्या किनाऱ्यावर आकाशात काळ्या ढगांनी दाटी केली होती. त्या पार्श्वभूमीवर खेकडे पकडताना एका मच्छिमार महिलेचे टिपलेले छायाचित्र. (छाया- नरेंद्र वास्कर)
-
मालवणी दारूकांडातील मृतांच्या नातेवाईकांनी मंगळवारी आझाद मैदानात मोर्चा आयोजित करून राज्य सरकारकडे न्याय देण्याची मागणी केली. (छाया- अमित चक्रवर्ती)
-
मालवणी दारूकांडातील मृतांच्या नातेवाईकांनी मंगळवारी आझाद मैदानात मोर्चा आयोजित करून राज्य सरकारकडे न्याय देण्याची मागणी केली. (छाया- अमित चक्रवर्ती)
पैसा.. मोठी नोकरी.. फ्लॅट…२०२६ वर्ष ‘या’ ३ राशींसाठी सुवर्णयुगाची सुरुवात; ३० वर्षांनंतर शनि-बुधाच्या दुर्मीळ युतीनं नशिब पालटणार