-
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपल्यामुळे सध्या लालबाग परिसरात गणरायाच्या मुर्ती बनविण्याच्या काम वेगात सुरू आहे. यासाठी उत्तरप्रदेश आणि बाहेरच्या राज्यांमधून मोठ्याप्रमाणावर कारागीर मुंबईत दाखल झाले आहेत. (छाया- अमित चक्रवर्ती)
-
सध्या मुस्लिम बांधवांच्यादृष्टीने पवित्र असणारा रमजानचा महिना सुरू आहे. यावेळी मुंबईच्या भेंडीबाजार येथील मिनारा मशिदीत नमाज अदा करण्यासाठी जमलेले भाविक. (छाया- प्रदीप दास)
-
आशियाईतील हत्तींना वाचविण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या निधीसाठी मंगळवारी लंडन येथे प्रिन्स चार्ल्स आणि त्यांच्या पत्नी कॅमिलिआ यांच्या उपस्थितीत ‘तारा’ या हत्तीणीच्या प्रतिकृतीचा लिलाव करण्यात आला. (छाया- पीटीआय)
-
नियम डावलून २०६ कोटी रुपयांची खरेदी केल्यावरून राज्याच्या महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर विरोधकांकडून लावण्यात आलेले गैरव्यवहाराचे सर्व आरोप त्यांनी बुधवारी फेटाळले. (छाया- प्रशांत नाडकर)
-
भारतीय रिझर्व्ह बँकेकडून मंगळवारी शंभर रूपयांची नवी नोट बाजारात आणण्यात आली. यावेळी कार्यक्रमात जुनी आणि नवी अशा दोन्ही शंभर रूपयांच्या नोटा प्रदर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या. नव्या नोटेच्या वरच्या बाजुला विशिष्ट संख्या वाढत्या आकारात छापण्यात आल्या आहेत. यापूर्वी जुन्या नोटेवर या संख्या एकाच आकारात असत. (छाया- पीटीआय)
पैसा.. मोठी नोकरी.. फ्लॅट…२०२६ वर्ष ‘या’ ३ राशींसाठी सुवर्णयुगाची सुरुवात; ३० वर्षांनंतर शनि-बुधाच्या दुर्मीळ युतीनं नशिब पालटणार