
अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या गाडीचा गुरुवारी अपघात झाला. या अपघातात त्या जखमी झाल्या आहेत. असेच काही सेलिब्रेटी आहेत ज्यांना अपघाताला सामोरे जावे लागले होते. त्यात काहीजण बचावले तर काहींचा दुर्दैवी मृत्यू झाला. 
बॉलीवूड अभिनेत्री आणि मॉडेल मुग्धा गोडसेचा पुण्याला प्रवास करताना अपघात झाला होता. स्कोडा या गाडीने जात असताना तीची गाडी महामार्गावरून घसरली होती. -
अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या गाडीचा गुरुवारी अपघात झाला. या अपघातात त्या जखमी झाल्या आहेत.

मराठीतील आघाडीच्या नाट्यकलावंत भक्ती बर्वे यांचा मुंबई-पुणे महामार्गावर अपघाती मृत्यू झाला होता. 
‘तेवर’ चित्रपटाच्या चित्रीकरणावरून परतत असताना निर्माता बॉनी कपूर यांच्या गाडीचा वाई येथे अपघात झाला होता. या अपघातात बॉनी यांना किरकोळ जखमा झाल्या होत्या. 
मराठी चित्रपट, टीव्ही आणि नाट्य क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तीमत्त्व आनंद अभ्यंकर यांचा २०१२मध्ये मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर कार अपघातात मृत्यू झाला होता. याच अपघातात टीव्ही कलाकार अक्षय पेंडसेही मृत पावला होता. -
मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता अरुण सरनाईक यांचाही भीषण अपघातात मृत्यू झाला होता.

आलिया भट्ट आणि वरुण धवन हे ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ चित्रपटाची प्रसिद्धी करत असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला होता. पण, सुदैवाने या दोघांना कोणतीही इजा झाली नव्हती. -
स्लमडॉग मिलेनियर या प्रसिद्ध चित्रपटात भूमिका साकारलेला अभिनेता मधुर मित्तल याच्या गाडीचा दहिसर येथे नुकताच अपघात झाला. या अपघात मधुर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

‘कबूल है’ मालिकेच्या सेटवर अभिनेता करणवीर बोहरच्या गाडीला टक्कर लागून अपघात झाला होता. 
विनोदी अभिनेता जसपाल भट्टी यांचा २०१२ मध्ये एका दुर्दैवी कार अपघातात मृत्यू झाला होता. -

सोनू सूदही अपघाताला सामोरा गेलेला आहे.
शनीच्या साडेसातीचा शेवटचा टप्पा! १७ दिवसानंतर ‘या’ ३ राशींच्या आयुष्यात चमत्कार; मिळेल भरपूर पैसा अन् सुख…