-
हारजीतपेक्षाही अत्युच्य दर्जाच्या टेनिसची मैफल गाजवणाऱ्या विम्बल्डन स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या अंतिम मुकाबल्यात नोव्हाक जोकोव्हिचने आपली मोहर उमटवली. कलात्मक शैलीपेक्षा घोटीव सातत्याच्या बळावर जोकोव्हिचने रॉजर फेडररवर ७-६, ६-७, ६-४, ६-३ असा विजय मिळवत विम्बल्डनच्या तिसऱ्या तर कारकीर्दीतील नवव्या ग्रँड स्लॅम जेतेपदावर कब्जा केला. (छाया: पीटीआय)
-
संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याने रविवारी दिवे घाटातील वारीच्या वाटेवरील अवघड टप्पा लीलया पार केला. हिरवाईने नटलेल्या घाटातील वाटेने सोहळा पुढे जात असतानाचे दृश्य ‘याचि देहि याचि डोळा’ पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. (छायाः संदीप दौंडकर)
-
आंतररष्ट्रीय स्तरावर भारतीय टेनिसची पताका सदैव अभिमानाने फडकावत ठेवणाऱ्या सानिया मिर्झाने विम्बल्डन टेनिस स्पर्धेत ऐतिहासिक जेतेपदावर नाव कोरताना आपल्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. स्वित्र्झलडच्या अनुभवी मार्टिना हिंगिसच्या साथीने खेळताना सानियाने कारकीर्दीतील पहिल्यावहिल्या महिला दुहेरीच्या ग्रँड स्लॅम जेतेपदाची कमाई केली. (छायाः पीटीआय)

त्र्यंबकेश्वर येथे रविवारी अधिक महिन्यातील एकादशीनिमित्त कुशावर्तात स्नानासाठी भाविकांनी केलेली गर्दी. (छायाः दीपक जोशी) 
विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत रविवारी विरोधकांची बैठक झाली. याला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, धनंजय मुंडे, व जोगेंद्र कवाडे उपस्थित होते. (छायाः केविन डिसूझा)
कतरिना कैफ ४२ व्या वर्षी झाली आई, विकी कौशलने दिली गुड न्यूज, माधुरी दीक्षित कमेंट करत म्हणाली…