
नाशिकमध्ये होणा-या कुंभमेळ्याच्या तयारीस सुरुवात झाली आहे. (छायाः दीपक जोशी) 
कुंभमेळ्यासाठी भाविकांनी केलेली गर्दी. (छायाः दीपक जोशी) 
यंदाच्या सिंहस्थ कुंभमेळ्यातील ध्वजारोहण पर्वात त्र्यंबकेश्वर पुरोहित संघ ताम्रपटाची भव्य पताका फडकवणार आहे. (छायाः दीपक जोशी) 
ताम्रपटाची ध्वजपताका तयार करण्याचे काम प्रगतिपथावर असून त्याच्या नक्षीकामाची जबाबदारी स्मृतिचिन्हकार सी. एल. कुलकर्णी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. (छायाः दीपक जोशी) 
त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाने कुंभमेळ्याची जय्यत तयारी करत पर्वणी काळात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. (छायाः दीपक जोशी) 
र्वणी काळात कुंभमेळ्यानिमित्त देशभरातील सर्व तीर्थ, नद्या त्र्यंबकेश्वर येथे येत असल्याची आख्यायिका असल्याने त्यांच्या स्वागतासाठी उभारण्यात येणारी कापडी ध्वजपताका यंदा बदलून ताम्रपटाची करण्यात येणार आहे. (छायाः दीपक जोशी)
मराठी अभिनेत्री होणार सुनील शेट्टीची सून? अहान शेट्टी रितेश देशमुखच्या को-स्टारला डेट करत असल्याच्या चर्चा