-
प्रो-कबड्डी लीगच्या पहिल्या हंगामाचीच पुनरावृत्ती दुसऱ्या हंगामाच्या सलामीच्या सामन्यात पाहायला मिळाली. अखेरच्या चढाईपर्यंत क्रीडारसिकांची उत्कंठा टिकवणाऱ्या या सामन्यात यु मुंबाने जयपूर पिंक पँथर्सचा २९-२८ असा एका गुणाने पराभव केला.
-
पांढराशुभ्र सलवार कुडता आणि काळे जॅकेट अशा पारंपरिक पेहरावात बॉलीवूडचे बादशाह आणि ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या धीरगंभीर आवाजातील राष्ट्रगीताने दुसऱ्या हंगामाची दिमाखदार सुरुवात झाली.
-
बॉलीवूडनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतील प्रो कबड्डीच्या दुसऱ्या हंगामाच्या सलामीच्या दिवशी बरेच बॉलीवूडचे सेलिब्रेटी हजर होते.
-
आमिर खान
-
यु मुंबाचा कर्णधार अनुप कुमार आणि शब्बीर बापू यांच्या चढाया फारशा प्रभावी ठरल्या नाहीत, तर जयपूरकडून जसवीर सिंग, सोनू नरवाल आणि राजेश नरवाल यांना चढायांचे गुण वाढवण्यात अपयश आले. परंतु दोन्ही संघांच्या क्षेत्ररक्षकांनी आपले कौशल्य दाखवल्यामुळे सामन्याची रंगत अखेपर्यंत वाढत गेली.
-
केंद्रीय क्रीडा मंत्री सरबनंदा सोनाोवाल, बीग बी अमिताभ बच्चन, त्यांची कन्या श्वेता नंदा. पत्नी जया बच्चन, यु मुंबाचे मालक रॉनी स्क्रुवाला, अभिनेता रिषी कपूर आणि आमिर खान आदी तारकांनी पहिल्या लढतीला उपस्थिती लावली होती.
एवढी रक्कम भरा, मगच व्यवहार रद्द! पार्थ पवारांच्या कंपनीला मुद्रांक शुल्क विभागाचा दणका…