-
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आडोशी बोगद्याजवळ बोरघाटात दोन गाड्यांवर मोठी दरड कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या घटनेत दोन गाड्यांमधील दोघे जण ठार झाल्याचं प्राथमिक वृत्त आहे. (छायाः नरेंद्र वासकर)
-
दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत डोंबिवलीचे शशिकांत धामणकर आणि भाईंदरचे दिलीपभाई पटेल यांचा जागीच मृत्यू झाला आहे. (छायाः नरेंद्र वासकर)
-
या घटनेत तीन महिलाही जखमी झाल्या आहेत. (छायाः नरेंद्र वासकर)
-
पोकलेन पोहचण्यास विलंब होत असल्याने आणि घाटात सुरू असलेल्या पावसामुळे दरड हटवण्यास अडचणी येत आहेत. (छायाः नरेंद्र वासकर)
-
आतापर्यंतची सर्वात मोठी दरड असल्याने ती हटवण्यासाठी किमान दोन दिवस तरी लागतील, असं सांगण्यात येतंय. (छायाः नरेंद्र वासकर)
-
-
-
-
मराठी अभिनेत्री होणार सुनील शेट्टीची सून? अहान शेट्टी रितेश देशमुखच्या को-स्टारला डेट करत असल्याच्या चर्चा