
एनएएसकास स्प्रिटं कप सिरीजदरम्यान रेसिंग कारने अचानक पेट घेतल्यावर कारमधून उडी मारताना एलेक्स बोमॅन. (छायाः पीटीआय) 
गणेशोत्सवासाठी गणरायांच्या मूर्त्यांची बाजारात आवक सुरु झाली आहे. (छायाः पीटीआय) 
सध्या बॉक्स ऑफिसवर गाजत असलेल्या बजरंगी भाईजान या चित्रपटाचा शो अलाहाबाद येथील चित्रपटगृहात सुरु असताना अचानक विद्युत पुरवठा खंडित झाला. त्यावेळी संतप्त प्रेक्षकांनी चित्रपटगृहाची तोडफोड केली. (छायाः पीटीआय) 
भोळी श्रद्धा आणि कर्मकांडामुळे मूळचे अप्रतिम शिल्पसौंदर्य कसे नष्ट होते, याचे ठळक उदाहरण म्हणजे ठाण्यातील कासार वडवली येथील ही श्री विष्णूची मूर्ती. घोडबंदर रोडवरील कासार वडवली गावातील तलावात सापडलेली ही शेषशाही विष्णूची मूर्ती ३ बाय ६ फूट इतकी भव्य आहे. येथून जवळच देवगिरीच्या रामचंद्र यादव राजाचा ताम्रपटही सापडला आहे. देवगिरीच्या यादवांनी इ.स. १२६५ला शिलाहारांचे राज्य बुडविल्यावर त्यांनी काही काळ ठाण्यावर राज्य केले. त्याच काळात त्यांनी येथे विष्णूचे मंदिर बांधले. मूर्तीचे मूळ रूप अतिशय देखणे होते. मस्तकावर सावली धरणाऱ्या शेष नागावर विष्णू पहुडले असून लक्ष्मी त्यांचे पाय चेपते आहे. छातीवर कमळ पुष्पात ब्रह्मदेव बसले आहेत. अशा या सर्वाग सुंदर मूर्तीला अलीकडे रंग लावण्यात आला आहे. लक्ष्मीला कपडे चढविण्यात आले आहेत. यामुळे मूर्तीचे मूळ सौंदर्य लोप पावले आहे. (जुने आणि नवे दोन्ही छायाचित्रे सदाशिव टेटविलकर यांच्या संग्रहातून.) 
आषाढी एकादशीचे औचित्य साधत कर्नाटकी आणि महाराष्ट्रीय संगीताचा अनोखा मेळ अभंगवाणीद्वारे अनुभवण्याची संधी पंचम निषादच्या वतीने रविवारी सायंकाळी महाकवी कालिदास कलामंदिरात रंगलेल्या ‘बोलावा विठ्ठल’ या कार्यक्रमाद्वारे नाशिककरांना मिळाली. ‘लोकसत्ता’ माध्यम प्रायोजक असलेल्या या कार्यक्रमाद्वारे राहुल देशपांडे, देवकी पंडित आणि आनंद भाटे यांचा स्वराविष्कार रसिकांना अनुभवता आला. (छाया- मयूर बारगजे) 
पाटणा पायरेट्सच्या खेळाडूची यशस्वी पकड करताना यू मुंबाचे खेळाडू. (छाया : केव्हिन डिसूजा) 
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मागील निवडणुकीच्या मागील निवडणुकीपूर्वी रेल्वे प्रवाशांसाठी खुल्या करण्यात आलेल्या स्कायवॉकची पाच वर्षांतच बिकट अवस्था झाली आहे. नूतनीकरणाचा एक भाग म्हणून स्कॉयवॉकच्या पॅनलची सफाई केली असता एक ट्रकभर कचरा या स्कायवॉकवरून जमा करण्यात आला. 
आपल्या विविध मागण्यांसंदर्भात ठाणे जिल्ह्यातील रेतीव्यावसायिकांनी खारेगाव टोलनाका येथे महामार्गावरील वाहतूक रोखून धरली. (छायाः दीपक जोशी)
प्रचंड पैसा, नवं घर, नोकरी…१५ नोव्हेंबरपासून ‘या’ राशींचे नशीब खुलणार; बुध अस्त योगानं भरभराट होणार, पिढ्यानं पिढ्या होतील समृद्ध