-
माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे पार्थिव मंगळवारी दुपारी विशेष विमानाने दिल्लीतील पालम विमानतळावर आणण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजशिष्टाचार बाजूला ठेवून विमानतळावर कलाम यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
-
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही विमानतळावर डॉ. कलाम यांना श्रद्धांजली वाहिली.
-
मंगळवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास तिरंग्यात गुंडाळलेले कलाम यांचे पार्थिव लष्करी अधिकाऱ्यांनी विमानातून बाहेर आणले.
-
प्रणव मुखर्जी आणि नरेंद्र मोदी दोघेही राजशिष्टाचार बाजूला ठेवत डॉ. कलाम यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दिल्ली विमानतळावर उपस्थित होते.
-
लष्करातर्फे यावेळी मानवंदनाही देण्यात आली.
-
कलाम यांचे पार्थिव दिल्लीतील १०, राजाजी मार्गावरील त्यांच्या सरकारी निवासस्थानी नेण्यात आले.
-
सेनादलाने कलाम यांना मानवंदना दिली.
-
‘मिसाईल मॅन’ला मानवंदना.
-
डॉ. कलाम यांच्या पार्थिवावर बुधवारी तामिळनाडूतील रामेश्वरम येथील त्यांच्या मूळगावी डॉ. कलाम अंत्यसंस्कार करण्यात येतील.
-
संसदेच्या दोन्ही सभागृहातही डॉ. कलाम यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. लोकसभेमध्ये अध्यक्षा सुमित्रा महाजन आणि राज्यसभेमध्ये सभापती हमीद अन्सारी यांनी शोकसंदेशाचे वाचन केले.
-
राष्ट्रध्वज अर्ध्यावर.
-
दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
-
आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी डॉ. कलाम यांना श्रद्धांजली वाहिली.
संकष्टी चतुर्थीला १२ राशी होणार संकटमुक्त; पदरी पडेल कल्पनेपलीकडील यश-लाभ; वाचा तुमचे राशिभविष्य