-
अभिनेत्री भूमी पेडणेकर ‘दम लगा के हईशा’ या चित्रपटात काम करत असताना तिचे वजन तब्बल ८९ किलो होते. त्यानंतर भूमीने आपले वजन घटवले असून काही दिवसांपूर्वीच तिने आपली नवी छायाचित्रे इन्स्ट्राग्रामवर शेअर केली आहेत. सध्या बॉलीवूडमध्ये उत्तम शरीरयष्टीसाठी ओळखले जाणारे नायक आणि कमनीय बांध्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या नायिका प्रत्यक्षात चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी दिसायला कशा होत्या, हे पाहून आपल्यापैकी अनेकांना धक्का बसेल.
-
अभिनेत्री श्रीदेवीची लहान मुलगी खुशीची लहानपणीची आणि आत्ताची छायाचित्रे पाहिल्यास कमालीचा फरक दिसून येईल. लहानपणी काहीशी जाडी दिसणाऱ्या खुशीचे नवे रूप पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसेल.
-
तरूणपणी चित्रपट निर्माता करण जोहरचे वजनही तब्बल १२० किलोंच्या आसपास होते. मध्यंतरी ‘झलक दिखला जा’ या रिअॅलिटी शोमध्ये स्वत:चे जुने छायाचित्र पाहून एकेकाळी आपण दिसायला असे होतो, यावर करण जोहरचा विश्वास बसत नव्हता.
-
अभिनेता अर्जून कपूरच्या जाडेपणाचे अनेक किस्से बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध आहेत. लहानपणी अर्जून इतका जाडा होता की त्याला बहुतेकदा ‘फुबू’ या ब्रँडचे कपडे खरेदी करावे लागत. त्यामुळे त्याला फुबू या नावाने चिडविण्यात येत असल्याचे ‘कॉफी विथ करण’ कार्यक्रमात सांगितले होते. एकेकाळी अर्जूनचे वजन १७० किलोपेक्षा जास्त झाले होते. त्यानंतर शरीरयष्टीवर बरीच मेहनत घेऊन तब्बल ६८ किलो वजन घटवले होते.
-
अभिनेता जॅकी भगनानीचे वजन पूर्वी १३० किलो होते. मात्र, त्यानंतर व्यायामशाळेत घाम गाळून जॅकीने जवळपास ८० किलोपर्यंत वजन कमी केले.
-
सध्या तरूणाईमध्ये लोकप्रिय असलेली अभिनेत्री आलिया भट्टदेखील लहानपणी स्थूल शरीरयष्टीची होती.

परिणिती चोप्रा 
चित्रपटसृष्टीत येण्यासाठी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानेही बरीच मेहनत घेतली आहे. ‘दबंग’ या चित्रपटात काम करण्यापूर्वी सोनाक्षीने स्वत:चे ३० किलो वजन घटवले होते. -
चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी अभिनेत्री सोनम कपूरचे वजन ९० किलो होते. मात्र, ‘सावरिया’ या चित्रपटापर्यंत तिने स्वत:चे ३० किलो वजन कमी केले होते.
२०२६ मध्ये कष्टांचं सोनं होणार! शनीच्या नक्षत्र गोचरामुळे उघडणार नशिबाचे दरवाजे – या ३ राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचा काळ