-
नवी मुंबईत बेलापूर येथे सेक्टर २९मध्ये अग्रोली गावात कोब्रा या प्रजातीच्या सापाचे येथील नागरिकांना दर्शन झाले. येथील वेल्डिंग कामाच्या छोट्याशा कारखान्यात एका कोप-यात तो दडून होता. माहिती मिळताच सर्पमित्र झेवियर डिसोझा याने त्याला पकडले आणि नंतर जंगलात सोडून दिले. या प्रजातीचे साप हे विषारी असल्याने तो पाहताच नागरिकांची भीतीने पाचावर धारण बसली. (छायाः नरेंद्र वास्कर)

किशोर कुमार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘ये शाम मस्तानी’ कार्यक्रमात गाताना गायक अमित कुमार आणि सुदेश भोसले यांचा मुलगा सिद्धांत भोसले. (छायाः पीटीआय) 
ईशान्यकडेली भागातील शांततेच्या दृष्टीने अशा करारावर सोमवारी सरकार व एनएससीएन (आयएम) यांच्यात स्वाक्ष-या करण्यात आल्या. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सोमवारी झालेल्या समारंभाला एनएससीएनचे सरचिटणीस मुईवा उपस्थित होते. (छायाः पीटीआय) 
मुंबई येथे आयोजित एका आंतरराष्ट्रीय फॅशन विकमध्ये भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाने पारंपारिक पोशाखात रॅम्पवॉक केला. (छायाः पीटीआय) 
वृक्षतोडीमुले पर्यावरणाची होत असलेल्या हानीची माहिती नागरिकांना व्हावी या उद्देशनाने कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयाच्या वतीने वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीचा सांगता सुभाष मैदान परिसरादरम्यान झाली. (छायाः दीपक जोशी) 
नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात कृत्रिम पावसाच्या प्रयोगावेळी सोमवारी काही अग्निबाण उड्डाण न घेता जागेवरच थांबले. एक-दोन आडवे-तिडवे झेपावल्याने पाहणा-यांची धावपळ उडाली. यामुळे आता पुढील दहा दिवस हा प्रयोग लांबणीवर पडला आहे. तर औरंगाबादचा कृत्रिम पावसाचा प्रयोग प्रशासकीय खेळात अडकला आहे. (छायाः संतोष बटाव) -
लोकसभेतून कॉंग्रेसच्या २५ खासदारांचे निलंबन करण्यात आल्याचा मंगळवारी पक्षाकडून तीव्र निषेध करण्यात आला. संसदभवन परिसरातील महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली दोन्ही सभागृहांतील सदस्यांनी धरणे आंदोलन केले. (छाया-पीटीआय)
-
अधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे एका दिमाखदार कार्यक्रमाद्वारे हॉन्डा कंपनीने मंगळवारी पाच नवीन दुचाकी बाजारात दाखल केल्या. त्यामध्ये ‘सीआरबी ६५० एफ’ या बहुप्रतिक्षित दुचाकीचाही समावेश आहे. (छाया – अमित चक्रवर्ती)
-
ठाणे शहरातील नौपाडा भागात सोमवारी रात्री पावणेदोनच्या सुमारास तीन मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला असून, सात जण जखमी आहेत. दरम्यान, इमारतीच्या ढिगा-याखाली अडकलेल्या मांजरीला वाचवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे. (छाया – दिपक जोशी)
टीम इंडियाची वर्ल्डकप फायनलमध्ये धडक! भारताच्या महिला संघाचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, जेमिमा ठरली विजयाची हिरो