-
कॅन्सरशी झुंझ देत असलेल्या कुंवर सिंह पाटील या ४ वर्षीय चिमुकल्याची पोलीस अधिकारी होण्याची इच्छा भोईवाडा पोलिसांनी सोमवारी पूर्ण केली. (पीटीआय)
-
चिमुकला कुंवर पोलिसांच्या गणवेशात तेही पोलिसांच्या गाडीतूनच पोलीस ठाण्यात दाखल झाला. (लोकसत्ता फोटो)
-
पोलीस ठाण्यात प्रवेश करताच त्याच्या चेहऱयावरचा आनंद पाहून उपस्थित पोलिसांनाही भरून आले. (लोकसत्ता फोटो)
-
कुंवर पोलीस अधिक्षकांच्या खुर्चीवर अगदी पोलीसी आवेशात विराजमान झाला. कुंवर आपल्यासोबत त्याची खास आवडती बंदुक देखील घेऊन आला होता. (लोकसत्ता फोटो)
-
उपस्थित पोलीस अधिकाऱयांनी या चिमुकल्या पोलीस अधिक्षकाला सलूट देखील ठोकला. हे पाहून कुंवरला देखील आनंद झाला. (लोकसत्ता फोटो)
-
कुंवरची इच्छा पूर्ण केल्याबद्दल त्याच्या पालकांनी भोईवाडा पोलिसांचे आभार व्यक्त केले.(लोकसत्ता फोटो)
-
घरी परत जाताना कुंवर उपस्थित पोलिसांना सलूट करून निघाला. (लोकसत्ता फोटो)
किडनी अन् लिव्हर खराब होणार नाही! फक्त स्वयंपाकघरात असणारा ‘हा’ एक पदार्थ खा, हृदयाच्या बंद झालेल्या नसा होऊ शकतात मोकळ्या