
ठाण्यात काढण्यात आलेल्या वर्षा रॅलीद्वारे या चिमुरड्यांनी नागरिकांना ‘स्वच्छ ठाणे, हरित ठाणे’चा संदेश दिला. (छायाः दीपक जोशी) 
गणेशोत्सव महिन्याभरावर आला असून मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची लगबग सुरु झाली आहे. अनेक मंडळांनी गणेशमूर्ती आणण्यास प्रारंभ केला आहे. (छायाः गणेश शिर्सेकर) 
उत्तर काश्मीरमधील हंडवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी रविवारी चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार केले. त्यावेळी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. (छायाः पीटीआय) 
वेगाचा बादशाह उसाेन बोल्ट याने जागतिक मैदानी स्पर्धेत १०० मीटर शर्यतीत आपणच वेगाचा अनभिषिक्त सम्राट असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले. (छायाः पीटीआय) 
वरळीच्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममधील प्रेक्षकांच्या ‘कुणीही घ्या पंगा जिंकेल फक्त यू मुंबा..’ या आरोळ्या सार्थ ठरवत यू मुंबाने प्रो कबड्डी लीगच्या जेतेपदाला रविवारी गवसणी घातली. प्रत्येक क्षणाला उत्कंठा वाढवणा-या अंतिम फेरीच्या लढतीत यू मुंबाने बंगळुरु बुल्सवर ३६-३० असा विजय मिळवला. गेल्यावर्षी मुंबईला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले होते. (छायाः पीटीआय) 
प्रो कबड्डीच्या दुसऱ्या हंगामात विजेता ठरलेल्या यू मुंबा संघाची सोमवारी मुंबईत विजयी मिरवणूक काढण्यात आली. यावेळ यू मुंबाच्या संघाने चर्चगेटपर्यंतचा प्रवास चक्क ट्रेनने केला. चर्चगेट रेल्वे स्थानकावर यू मुंबाचा कर्णधार अनुप कुमारला संघ सहकाऱ्यांनी उचलून घेतले. (छाया- दिलीप कागडा) -
चीनमधील आर्थिक स्थितीमुळे आशियाई बाजारपेठेत झालेल्या घसरणीचा परिणाम सोमवारी भारतीय शेअर बाजारावरही झाला. मुंबई शेअर बाजारावर याचा सर्वाधिक परिणाम दिसून आला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये सोमवारी १६२५ अंशांची घसरण झाली. (छाया- गणेश शिर्सेकर)
-
कांद्याचे दर गगनाला भिडल्याने संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून मुख्यमंत्र्यांना कांद्याचा पुष्पगुच्छ भेट म्हणून देऊ केला. (छाया- अमित चक्रवर्ती)
गाडी…बंगला…नोकरी, पैसा आणि बरंच काही; २०२६ पासून ‘या’ एका राशीचं नशिब फळफळणार, श्रीमंतीमुळे पिढ्यान पिढ्या समृद्ध होणार