
भारताविरुद्धच्या कोलंबो येथील दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर श्रीलंकेचा कर्णधार कुमार संगकाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. यावेळी त्याला श्रीलंकन संघाकडून भावूकपणे निरोप देण्यात आला. (छाया- राऊटर्स) 
या निरोप समारंभाला संगाकाराची पत्नी येहाली उपस्थित होती. (छाया- राऊटर्स) 
याशिवाय, त्याच्या दोन्ही मुलगी आणि वडीलही यावेळी मैदानावर उपस्थित होते. (छाया- राऊटर्स) 
निरोप समारंभाच्यावेळी संघ सहकाऱ्यांनी संगाकाराला उचलून घेतले तो क्षण. (छाया- राऊटर्स) 
भारताचा कर्णधार विराट कोहली संगाकाराची भेट घेताना. (छाया- राऊटर्स) 
यावेळी श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाल सिरीसेना यांनी विशेष मानचिन्ह देऊन संगाकाराचा गौरव केला. (छाया- राऊटर्स) 
भारतीय संघाचे संचालक रवी शास्त्री संगाकाराला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देताना. (छाया- राऊटर्स) 
बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर मानचिन्ह देऊन संगाकाराचा गौरव करताना. (छाया- राऊटर्स) 
एक सर्वकालीन महान डावखुरा फलंदाज, असं संगकाराचं वर्णन करता येईल. कारण फक्त कसोटी क्रिकेटच नाही तर एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्येही त्याने आपल्या कामगिरीचा अमिट ठसा उमटवलेला आहे. (छाया- राऊटर्स) 
तब्बल ११ द्विशतकं झळकावणारा सर डॉन ब्रॅडमन यांच्यानंतरचा दुसरा फलंदाज. (छाया- राऊटर्स) 
(छाया- राऊटर्स) 
श्रीलंकेतील कॅण्डीमध्ये कुमारचे बालपण गेले. एका बाजूला तळं आणि दुसऱ्या बाजूला टेनिस क्लब, दोन्हीही त्याच्या आवडत्या गोष्टी. वडील क्षेमा हेदेखील एक खेळाडू. वडिलांचा संगकारावर फार मोठा प्रभाव नेहमीच दिसला. (छाया- राऊटर्स) -
सातव्या वर्षांपासून संगकारा क्रिकेट खेळायला लागला आणि सुनील फर्नाडो यांच्याकडे खासगी कोचिंगला तो जायचा, जिथे त्याची भेट झाली ती महान फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनशी. मुरली त्याला ५ वर्षांनी मोठा होता. १२व्या वर्षी त्याने क्रिकेट गंभीरपणे खेळायचा निर्णय घेतला आणि त्यानंतर त्याने शाळा आणि क्लब क्रिकेट गाजवले.
-
१७व्या वर्षी नेमके काय करायचे, याचा प्रश्न त्याला पडला होता, कारण टेनिस आणि क्रिकेट हे दोन्ही त्याचे आवडते खेळ आणि दोन्हीमध्ये चांगली कामगिरी होतच होती. अखेर कुमारने क्रिकेटची निवड केली.
-
स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करत श्रीलंकेच्या ‘अ’ संघात स्थान मिळवले. मायदेशात झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात कुमार नाबाद १५६ धावांची खेळी साकारली. या खेळीतला एक षटकार थेट पॅव्हेलियनच्या खिडकीवर आदळला होता. हेच प्रशिक्षक डेव्ह वॉटमोर यांनी हेरले आणि कुमार राष्ट्रीय संघात दाखल झाला.
-
पहिल्याच मालिकेत तो मालिकावीर ठरला होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या मैदानावरील मालिकेत त्याने कसोटी पदार्पण केले. पण हे पदार्पण विशेष गाजले नाही. यानंतर श्रीलंका आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेली आणि तिथून इतिहास रचायला सुरुवात झाली.
-
२००४ची गोष्ट. संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर होता आणि मायदेशात त्सुनामीने थैमान घातले होते. क्रिकेट सोडून संघ लंकेत परतला, जयवर्धने आणि मुरली यांच्याबरोबर कुमारने देश पिंजून काढला. मुरलीच्या फाऊंडेशनबरोबर काम करत त्यांनी जवळपास एक हजार घरे नव्याने वसवली.
-
२००६ साली मव्र्हन अट्टापटू जायबंदी झाल्याने जयवर्धने कर्णधार तर कुमार उपकर्णधार झाला. ही जबाबदारी स्वीकारल्यावर दुसऱ्याच मालिकेत या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ६२४ धावांची विक्रमी भागीदारी रचली. यामध्ये कुमारचा वाटा २८७ धावांचा होता.
-
चेंडू बॅटवर कसा घ्यायचा, फटके कसे मारायचे, फलंदाजीचे तंत्र आणि शिस्त, समर्पण कसे असायला हवे, याचा उत्तम वस्तुपाठ म्हणजे ही खेळी होती.
-
कुमारच्या कर्णधारपदाच्या कारकीर्दीत श्रीलंकेचा संघ चांगलाच बहरला होता. २०११च्या विश्वचषकात कुमारच्या नेतृत्वाखाली संघाने पुन्हा अंतिम फेरी गाठली, पण उपविजेतेपदच त्यांच्या पदरी पडले. आगामी विश्वचषकाच्या तयारीसाठी त्याने युवा कर्णधार नेमण्याची विनंती करत कर्णधारपद सोडले.
-
-
-
-
-
-
-
-
-
कतरिना कैफ ४२ व्या वर्षी झाली आई, विकी कौशलने दिली गुड न्यूज, माधुरी दीक्षित कमेंट करत म्हणाली…