-
इंडोनेशियातील एका दहा वर्षांच्या मुलाचे वजन इतके वाढले आहे की त्यामुळे त्याच्या शारीरिक हालचालींवर अनेक मर्यादा आल्या आहेत. याच पद्धतीने पुढील काळातही त्याचे वजन वाढतच राहिले, तर कदाचित त्याचा मृत्यूही होऊ शकतो, असे डॉक्टरांनी म्हटले आहे. (Source: YouTube)
-
आर्या परमना असे या मुलाचे नाव असून सध्या त्याचे वजन तब्बल १९२ किलो इतके आहे. इतके वजन हा एक प्रकारचा आजारच असल्याचे म्हणणे आहे. अचानकच आर्याचे वजन वाढल्यामुळे त्याला शाळाही सोडावी लागली. (Source: Caters News Agency)
-
आर्या दिवसातून पाचवेळा पूर्ण जेवण घेतो. यामध्ये भात, मासे, गोमांस, शाकाहारी सूप अशा पदार्थांचा समावेश असतो. (Source: Caters News Agency)
-
आर्याच्या शरीराचा आकार इतका मोठा आहे की त्याच्यासाठी त्याच्या मापाचे कपडेही मिळत नाही. त्यामुळे त्याला घरात केवळ अत्यल्प कपडे घालून ठेवण्यात येते. आर्याच्या पालकांनी आता त्याचे जेवण कमी करण्याचा निर्णय घेतलाय. (Source: Caters News Agency)
-
आर्याच्या वाढत्या वजनामुळे त्याच्या जीवाला धोका असल्याने त्याचे आई-वडील दोघेही खूप चिंतित आहेत. (Source: Caters News Agency)

पैसाच पैसा! ५० वर्षानंतर सूर्याच्या राशीमध्ये निर्माण होईल त्रिग्रही योग, कोणाचे पालटणार नशीब अन् कोणाची होणार प्रगती, जाणून घ्या