-
गुजरातच्या उत्तर भागातील मेहसाणा जिल्ह्यातल्या वाडनगर या लहानशा गावात १७ सप्टेंबर १९५० मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म झाला.
-
२०१४ च्या निवडणुका ह्या म्हणजे सरकार बदलणे नव्हे तर लाखो भारतीयांसाठी तो आशेचा किरण आहे: भाजपच्या राष्ट्रीय कौन्सिल परिषदेत मोदींनी म्हटले होते.
-
कॉंग्रेसच्या घराणेशाहीच्या राजकारणाने जनसामान्यांच्या आशा-आकांक्षा धुळीस मिळवल्या आहेत. जेव्हा जेव्हा त्यांचे शासन चुकते किंवा त्यांचे गैरवर्तन उघडकीस येते, तेव्हा तेव्हा कॉंग्रेस धर्मनिरपेक्षतेचा बुरखा परिधान करते.
-
२१ वे शतक हे ज्ञानाचे शतक आहे. जेव्हा जेव्हा ज्ञानावर भर दिला गेला, तेव्हा तेव्हा जगाच्या आशा भारतावर खिळल्या. ज्ञानाधिष्ठित समाज ही आता फक्त घोषणा राहिलेली नाही, तर ते आता वास्तव बनले आहे.
-
बुद्धिमत्ता, परंपरा, पर्यटन, व्यापार आणि तंत्रज्ञान 'ब्रँड इंडिया' या ५ गोष्टींच्या पायावर उभा असेल.
-
स्वप्नांना स्थैर्य हवे. ती स्थिरता स्वप्नांना लाभली, तर ती निश्चयात- संकल्पात परिवर्तीत होतील; जेव्हा त्यांना कठोर परिश्रमांची साथ लाभेल, तेव्हा ती सिद्धीत उतरतील.
-
वसुधैव कुटुम्बकम ही आमची प्राचीन धारणा असल्याने जागतिक शांती आणि विकासासाठी आम्ही नेहमीच आग्रही आहोत.
-
माझ्या राज्यात 'लाल फिती'ला थारा नाही, पण 'रेड कार्पेट' मात्र निश्चित आहे.
-
'File'मध्ये 'Life' आणण्याचा म्हणजे शासकीय कामांना मानवी चेहरा देण्याचा माझा प्रयत्न आहे.
-
दहशतवाद हीच जगासमोरची सर्वात मोठी समस्या आहे. या दहशतवादाला आमच्या शेजाऱ्यांनी खतपाणी घातले असले तरी आज त्याची सावली जगभर पसरत आहे. कोणताही भेदाभेद न करता , दहशतवाद पोसणाऱ्यांना एकाकी पाडले पाहिजे.

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल